डोक्याला पिस्तूल लावत पती पत्नीस मारहाण! तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पाईपलाईन रोड वरील जागेच्या वाद पेटला

अहमदनगर ९ मार्च( प्रतिनिधी)- डोक्याला पिस्तूल लावत पती,पत्नीस मारहाण करण्याची घटना सावेडी उपनगरात घडली आहे.याबाबतची माहिती अशी की,उपनगरातील पाईपलाईनरोड ला जागेच्या वादावरून थेट पिस्तुल डोक्याला लावून पती पत्नीस मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली. कुलदीप भिंगारदेवे व त्यांची पत्नी भाजी आणण्यासाठी यशोदा नगर मध्ये जात असताना जीशान शेख या युवकाने कुलदीप भिंगारदिवे यांना आडवून जागेच्या वादात तू पडू नकोस असा दम दिला याबाबत कुलदीप भिंगरदिवे यांनी हा वाद कोर्टात चालू असून जो निर्णय लागेल तो अम्ही मान्य करू असे सांगितले याचा राग येऊन जीशान शेख याच्या बरोबर असलेल्या अनोळखी इसमांनी कुलदीप भिंगारदिवे यांना मारहाण करत शिवीगाळ सुरू केली.हा प्रकार पाहून कुलदीप भिंगारदिवे यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली असता कुलदीप भिंगारदिवे यांच्या पत्नीसही मारहाण करण्यात आली तसेच जीशान शेख याने आपल्याजवळील बंदूक त्याच्या सोबत असणाऱ्या तन्मीन शेख याच्याकडे दिली आणि त्याने ती बंदूक कुलदीप भिंगारदिवे यांच्या डोक्याला लावली ही घटना पाहून कुलदीप भिंगारदिवे यांच्या पत्नीने त्या ठिकाणी माफी मागत भांडण मिटवून घेण्याची विनंती केली आणि तेथून निघुन गेले.या प्रकरणी जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिशान शेख,अशोक शेकडे,तन्मीन शेख आणि अन्य चार अनोळखी लोकांवर कुलदीप भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.