माणसांना माणसात आणण्यासाठी झटतेय “मानवसेवा”! मध्यप्रदेशमधून हरवलेली महिला चार वर्षानंतर सुखरुप पोहोचली कुटुंबात…

अहमदनगर दि. 24 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
अहमदनगर येथील केडगाव परिसरात एक मानसिक विकलांग युवती रस्त्यावर अगदी सुन्न अवस्थेत जगण्याचं भान हरवून फिरत होती. या युवतीला कोतवाली पोलीसांच्या मदतीने श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘मानवसेवा’ प्रकल्पात दि.०२ जुलै २०२२ रोजी उपचार व पुनर्वसनासाठी दाखल केले होते. स्वत:चे अस्तित्व विसरून रस्त्यावर भटकणाऱ्या या महिलेला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘मानवसेवा’ प्रकल्पात पोषक वातावरणासह मोफत अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मुलभूत सुविधां पुरविण्यात आले. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, डॉ सुरेश घोलप यांनी या युवतीवर उपचार करुन बरे केले. संस्थेचे स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, मंगेश थोरात, ऋतिक बर्डे, सिराज शेख, पुजा मुठे, मथुरा जाधव- बर्डे, शोभा मेंगाळ दुधवडे, राहुल साबळे, सिराज शेख, राहुल साबळे यांनी या युवतीचे कुटुंब शोधून तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले. समुपदेशनातून मिळालेल्या माहितीच्या आधारे कुटुंबीयांशी संपर्क केला. मध्यप्रदेशमधून हरवलेली महिला अखेर मानवसेवा प्रकल्पाच्या उपचार व समुपदेशनाने चार वर्षानंतर सुखरुप कुटुंबीयांच्या ताब्यात पोहोचली. आईची भेट होताच मुलाचा आनंद द्विगुणित झाला.
मानवसेवा हीच ईश्वर सेवा!