सामाजिक
अकोला येथे नामदार जितेंद्र आव्हाड युवा मंच ची बैठक संपन्न

विदर्भ(प्रतिनिधी) नामदार डॉ.जितेंद्र आव्हाड युवा मंच ची बैठक नुकतीच अकोला जिल्हा येथे
राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष प्रमोद सरोदे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड युवामंच विदर्भ यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.यावेळी युवा मंच चे संघटन मजबूत करण्यावर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पदाधिकार्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच पदाधिकार्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी विदर्भ अध्यक्ष आकाश धवसे, महासचिव ॲड. रिहान शेख, अमरावती विभाग अध्यक्ष नकुल पाटील, अमरावती जिल्हा अध्यक्ष शुभम मेश्राम, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अमित पांडे, सुनील भगत तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.