सामाजिक
सकल मराठा समाज कर्जतचे साखळी उपोषण सुरू, छत्रपत्री सभांजीराजे यांच्या उपोषणास पाठींबा

कर्जत प्रतिनिधी : दि २८
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी राजेभोसले यांच्या आंदोलनास सकल मराठा समाज कर्जत यांनी जाहीर पाठींबा व्यक्त करीत रविवार, दि २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करावे आणि छत्रपती संभाजी महाराज यांना उपोषणापासून परावृत्त करावे या मागणीचे निवेदन सकाळीच कर्जत प्रशासनास देण्यात आले होते. शासनाने छत्रपत्री संभाजी महाराज यांचे उपोषण परावृत्त न केल्यास मंगळवार, दि १ मार्च पासून सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने बेमुदत कर्जत बंदचा नारा प्रमुख समन्वयक धनंजय लाढाणे आणि मराठा सेवक यांनी प्रशासनास दिला आहे.