मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत छत्रपती संभाजी महाराज यांना उपोषणापासून परावृत्त करावे – सकल मराठा समाज कर्जतची मागणी

कर्जत प्रतिनिधी : दि २७
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी राजेभोसले यांच्या आंदोलनास सकल मराठा समाज कर्जत जाहीर पाठींबा देत आहोत. मराठा समाजाच्या मागण्या शासनाने तात्काळ मान्य करावे आणि छत्रपती संभाजी महाराज यांना उपोषणापासून परावृत्त करावे. अशी मागणी सकल मराठा समाज कर्जतच्यावतीने तालुका प्रशासनास निवेदन देत केली आहे. यावेळी कर्जतचे प्रमुख समन्वयक धनंजय लाढाणे यांच्यासह मराठा सैनिक उपस्थित होते.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे छत्रपती संभाजी राजेभोसले यांचे अमरण उपोषण सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजास आरक्षण मिळावे. मराठा आरक्षण मिळविण्यासाठी न्या.भोसले समितीने केलेल्या शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रीया सुरु करावी. तसेच ईसीबीसी व एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातुन शासकीय सेवेत निवड झालेल्या पण अदयाप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती दयावी. सारथी संस्थेच्या सबलिकरणासठी रोड मॅप तयार करुन सारथी संस्थेचे सक्षमिकरण करने व येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थ संकल्पात भरीव निधीची तरतुद करावी. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडाळाद्वारे दिला जणारा १० लाख रुपये कर्ज व्याज परतावा हा २५ लाख रुपये करुन अंमलबजावणी व्हावी. यासह महामंडळाला जाहीर केलेल्या ४०० कोटी रुपयांच्या भागभांडवलापैकी केवळ अंदाजे ३० ते ५० कोटी रुपये मिळाले इतर रक्कम देण्याचा शासन निर्णय निघाला मात्र तो ही अजुन मिळालेला नाही. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र कोणालाही नोकरी दिलेली नाही व यावरती तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. या सोबत इतरही काही मागण्या प्रलंबित असुन योग्य तो तातडीने निर्णय शासनाने घ्यावा. आणि छत्रपती संभाजी महाराज यांना उपोषणापासून परावृत्त करावे. अन्यथा कर्जत तालुका सकल मराठा समाज रविवार, दि २७ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजतापासून साखळी उपोषण करणार असून निषेध नोंदविण्यासाठी दि १ मार्चपासून बेमुदत कर्जत बंदचे आवाहन करणार असल्याचा इशारा प्रशासनास निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सकल मराठा समाज कर्जतचे प्रमुख समन्वयक धनंजय लाढाणे यांच्यासह मराठा सैनिक उपस्थित होते.