पुतीन यांचा बिघडला आहे ब्रेन, त्यामुळे परेशान आहे युक्रेन- केंद्रीय मंत्री रामदास आठवले

(प्रतिनिधी)सतीश वैजापूरकर
राहाता-शिर्डी
ता.२८।२।२०२
केंद्रीय समाजकल्याण राज्य मंती रामदास आठवले यांनी काल सपत्नीक शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांच्या मिश्किल बोलण्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात काल पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले रशिया युक्रेन ते नगर कोपरगाव रस्त्यावरील खड्डे असा ग्लोबल ते लोकल भासणारा लांब पल्ल्याचा प्रवास करत मी आलो आहे.
पुतीन यांचा बिघडला आहे ब्रेन, त्यामुळे परेशान आहे युक्रेन…
असे झकास यमक जुळवीत त्यांनी पत्रकार परिषदेला प्रारंभ केला.
लगेचच नगर कोपरगाव राज्यमार्गावरील खड्डयांबाबत नापसंती दर्शविली.
पत्रकार परिषदेत नेहमी सारखा रंग भरला नाही मात्र काही लक्षवेधी विधानांनी बातम्यांचे मथळे जरूर दिले.
आज सकाळ ने त्यांच्या या मिश्कीलीवर आधारीत वेगळी बातमी प्रसिध्द केलीय.
कालच्या पत्रकार परिषदेतील त्यांची काही विधाने पहा…
नबाब मलीक मंत्री म्हणून चांगले मात्र त्यांचे जमिनीचे व्यवहार चांगले नाहीत.
कुणीही कुणाची जमिन बळकाऊ नये.
एका मंत्र्याला अटक करून आम्हाला सरकार पाडायचे नाही.
ते आपसातील कुरबूरीमुळे पडेल.
राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस सोबत जाणे शिवसैनिकांना आवडलेले नाही.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अद्यापही विचार करावा अन्यथा मुंबई महानगर पालिका व पुढे विधानसभा भाजप आरपीआय युती ताब्यात घेईल.
खासदार संजय राऊत यांच्या भडक विधानांकडे लक्ष देऊ नका.
शिर्डीवर आपले प्रेम आहे हे या भेटीतही सांगायला ते विसरले नाहीत.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावातील कुठल्या ना कुठल्या कार्यकर्त्यां सोबत नावानीशी ओळख आहे.
त्यांनी अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ सत्तेत रहाणारा पक्ष अशी त्यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाची ओळख आहे.
राष्ट्रीय राजकारणात त्यांनी स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केलेय.
त्यापाठोपाठ भाजपचे स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता.
राज्यातील जवळपास प्रत्येक गावात त्यांना ओळखणारे कार्यकर्त होते आणि आहेत.
मुंडे साहेब म्हणजे झंझावात आणि त्यातून भाजपचा विस्तार असे समिकरण रुढ झाले होते.
मी यमक जुळवित दोन ओळीच्या कविता ते संसदेत सादर करू लागले की, स्व.अटलजी, लालजी, सोनियाजी आणि आता मोदींसह दोन्ही बाजुंचे सदस्य हसून दाद देतात.
अशीच दाद त्यांना पत्रकार परिषदेत आणि जाहिर मेळाव्यातही मिळते.
दलित पॅंथर असताना आणि नंतर आरपीआय ची बांधणी करताना त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.
राज्यातील प्रत्येक गावात माझे चाहते आणि कार्यकर्ते आहेत.
माझी छबी असलेला फ्लेक्स नाही असे गाव सापडणे कठीन आहे.
आठवले साहेब म्हणजे बातमी हे समिकरण रूढ झाल्याने प्रसारमाध्यमातून केंद्र सरकारची कामगीरी सतत लोकांसमोर ठेवणे त्यांना शक्य होते.
उत्तर प्रदेशातील निवडणुकीत ते भाजपच्या प्रचाराला निघाले आहेत.
उद्या गोरखपुर मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी प्रचार करणार आहेत.
काल ते आरपीआय चे त्यांचे जवळचे स्नेही व चळवळीतील कार्यकर्ते विजूभाऊ वाकचौरे यांच्या मुलाच्या लग्नास उपस्थीत रहाण्यासाठी शिर्डीत आले होते.
कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नापासून ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभे पर्यत अखंड भ्रमंती हि कामाची पध्दत आहे.
अनेक जय पराजय स्विकारत, राजकारणातील चढ उतार आणि टिका टिपणी सोसत, वेळ प्रसंगी मोठा संघर्ष करीत, काॅग्रेस ते भाजप व्हाया शिवसेनेची सोबत असा प्रवास करीत आरपीआयचा हा एकांडा शिलेदार असलेला नेता आपल्या करीश्म्यावर राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करतो.
हि दिसते तेवढी साधी सोपी गोष्ट नाही.
म्हणूनच आजच्या लेखन प्रंपचाला शिर्षक दिलेय,
आठवले साहेब रशिया युक्रेन व्हाया नगर कोपरगाव रस्त्यावरील खड्डे.
काल पत्रकार परिषदेसाठी ते आले आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या…
आठवले साहेबांचा विजय असो…
आठवले साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है.
असा माहोल असला की ते खुश असतात.
या पत्रकार परिषदेस रिपब्लीकन पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत भालेराव, बाळासाहेब गायकवाड, दिपक गायकवाड, कैलास शेजवळ, रावसाहेब बनसोडे, प्रदिप बनसोडे,सुनिल साळवे,सुरेंद्र थोरात, भिमराज बागुल आदि पदाधिकारी उपस्थीत होते.
लक्षवेधी व्यक्तीमत्व, रंगीबेरंगी पोषाख, कार्यकर्त्यांचा गराडा, अखंड भ्रमंती आणि यमक जुळविणारी मिश्कीली हे आठवले साहेबांचे बलस्थान.
शिर्डीवर त्यांचे सर्वाधिक प्रेम त्यामुळे आम्हा पत्रकारांना त्यांचा सहवास अधिकच आहे.