अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे नालेगाव ता. नगर येथील दौंड मनमाड रेल्वे दुहेरीकरण यासाठी नालेगावातील शेतकरी यांच्या शेतजमिनी पूर्वी रेल्वे रूळा पासून 13 मीटर अंतर सोडून रेल्वेने मोठे खाब लावलेले होते. परंतु आत्ता चालू पिकांमध्ये जमिनीमध्ये 13 मीटर सोडून 26 मीटर ते 30 मीटर शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या शेतीमध्ये अंतर वाढून खाब लावण्यात आलेले आहे याबाबत सर्व शेतकऱ्यांची हरकत असून त्यांना जमिनीची जेवढे क्षेत्र गेले आहे. त्याचा मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांना निवेदन देताना. आमदार संग्राम जगताप समवेत पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे सचिव दत्ता वामन, महिला जिल्हा अध्यक्षा सुरेखाताई सांगळे, नगरसेवक अविनाश घुले, सुहास मुळे, कैलास दळवी, रावसाहेब काळे, गणेश साळुंके, रवींद्र कवडे, देविदास रोहोकले, सनी लांडे, विशाल म्हस्के, बबनराव रोहकले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा अद्याप पर्यंत प्रशासनाने सदर पत्रावर कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही. तरी लवकरात लवकर कारवाई करावी व शेतकऱ्यांची जेवढी जमिनीचे क्षेत्र गेलेले आहे. त्याचा मोबदला लवकरात लवकर मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.