ब्रेकिंग

अवैध मावा विक्री करणाऱ्या व्यवसायाविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई आरोपीसह 2,05,280/-किंमतीचा मुद्देमाल जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 14 ऑगस्ट : मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे. नमुद आदेशान्वये श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले, प्रकाश मांडगे, रोहित मिसाळ, अमोल आजबे व अरूण मोरे यांचे पथक तयार करुन अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेकामी पथकास रवाना केले.
दिनांक 14/08/2026 रोजी पथक पारनेर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फैजल सलीम तांबोळी, रा.भाळवणी, ता.पारनेर हा भाळवणी गावचे शिवारात गणेश चेमटे याचे शेतीमधील पत्र्याचे शेडमध्ये सुगंधी तंबाखु व सुपारी एकत्रितपणे मावा विक्रीच्या उद्देशाने तयार करीत आहे. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम सुगंधी तंबाखु व सुपारी एकत्रीत करून मावा पुडयामध्ये भरीत असताना मिळून आल्याने 1) सलीम दादामियाँ तांबोळी, वय 52, रा.भाळवणी, ता.पारनेर जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीचे कब्जातून 1,05,000/- रू किं.मावा तयार करण्यासाठी इलेक्ट्रीक मशीन, 40,000/- रू किं.चा 20 किलो तयार मावा,5,000/- रू किं.5 किलो सुगंधीत तंबाखु, 40,000/- रू किं.40 किलो सुपारी चुरा, 5,000/- रू किं.5 किलो कलर, 7,000/- रू किं.एक इलेक्ट्रीक काटा, 2,880/- रू किं.विमल पानमसाला, 400/- रू किं.इतर साहित्य असा एकुण 2,05,280/- रू किं. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस करता त्याने जप्त माल सुगंधीत तंबाखु 2) फैजल सलीम तांबोळी, रा.भाळवणी, ता.पारनेर (फरार) याने 3) इंतुभाई उर्फ इंतिखाबआलम सैन, रा.अहिल्यानगर (फरार) व 4) ज्ञानेश्वर गायकवाड, रा.एमआयडीसी, अहिल्यानगर (फरार) याचेकडून खरेदी केल्याची माहिती सांगीतली.आरोपविरूध्द पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 613/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे