गुन्हेगारी

खुनाचा प्रयत्न करणारा सराईत आरोपी रुपेश तुळशीराम गायकवाड यास तोफखाना पोलिसांनी केले अटक

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 14 ऑगस्ट : थोडक्यात हकीगत अशी की, फिर्यादी अभिषेक रवि साखरे, वय २० वर्षे, धंदा शिक्षण, रा.पर्जन्येश्वर मंदिराजवळी, दातरंगे मळा, ता.जि.अहिल्यानगर हा व त्याचा मित्र चैतन्य हे दोघे दि.०८/०९/२०२५ रोजी 10.३० वा.चे सुमारास हनुमान पान स्टॉल, निलक्रांती चौक, अहिल्यानगर येथे पान खात असताना यातील आरोपी अमोल बाळु पाडळे, ऋतिक नितिन साळवे, अक्षय सुभाष पवार, रुपेश तुळशीराम गायकवाड व निखिल अजय साळवे, अक्षय भगवान साळवे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन अमोल बाळु पाडळे यास गाडीचा कट का मारला ? या कारणांवरुन फिर्यादीस लाथाबुक्यांने व लोखंडी रॉडने बेदाम मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन पो.स्टे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.सदरचा गुन्हा दाखल झाले पासुन आरोपी रुपेश तुळशीराम गायकवाड, वय ३४ वर्षे, रा.निलक्रांती चौक,बालिकाश्रम रोड,ता.जि.अहिल्यानगर याचा अनेक दिवसापासुन शोध चालु होता, परंतु तो दरवेळी पोलिसांना गुंगारा देत होता.
दि.१४/०८/२०२६ रोजी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी रुपेश तुळशीराम गायकवाड हा नालेगांव परिसरातील लांडे स्थळ येथे येणार आहे, अशी गुप्त बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख योगेश चाहेर व पो.कॉ अविनाश बर्डे, बाळासाहेब भापसे, शाकीर सय्यद यांना बातमीची माहिती देवुन आरोपी रुपेश तुळशीराम गायकवाड यास ताब्यात घेण्याबाबत कळविले असता पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर तसेच पोलीस स्टाफने नालेगांव परिसरातील लांडे स्थळ येथे सापळा लावुन रुपेश तुळशीराम गायकवाड यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे. रुपेश तुळशीराम गायकवाड याचे विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री.मुम्मका सुदर्शन सो, मा.अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री.वैभव कलुबर्मे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, नगर शहर विभाग,अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री.बालाजी वैद्य, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे