देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 14 ऑगस्ट : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, श्री.राजेश्वर मनोहर भोसले, रा.बालीकाश्रम रोड, सुडके मळा यांना घर घेऊन देतो असे सांगुन आरोपी संकेत राजेंद्र भोसले, रा.पिंपळगाव माळवी, ता.अहिल्यानगर याने फिर्यादीकडून 6,50,000/- रुपये ऑनलाईन व रोख स्वरुपात घेतले.पैस घेतल्यानंतर त्याने फिर्यादीस घर दिले नाही वा घेतलेले पैसे परत केले नाहीत. याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं 562/2025 भारतीय दंड संहिता कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपीने मा.न्यायालयात क्रिमीनल बेल ऍ़प्लीकेशन 999/2025 प्रमाणे अटकपुर्व जामीन दाखल केला.परंतु आरोपी संकेत राजेंद्र भोसले याचा जामीन मा.न्यायालयाने नामंजूर केल्यानंतर तो फरार झाला होता.
गुन्हयाचे तपासात तोफखाना पोलीस स्टेशन यांनी आरोपीचा शोध घेणकामी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना कळविले.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार संदिप पवार, शाहीद शेख, गणेश धोत्रे अशांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
तपास पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 13/08/2026 रोजी आरोपी भिस्तबाग महाल, तपोवन रोड येथे मिळून आल्याने 1) संकेत राजेंद्र भोसले, वय 30, रा.पिंपळगाव माळवी, ता.जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन, तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
वरील कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा