नगर जामखेड रोडवर अवैध वाळू डंपरला सापळा लावून २०,६०,००० वीस लाख साठ हजाराच्या मुद्देमालासह एका आरोपीस-अटक अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची वाळू उपसा वर धडाकेबाज कारवाई

अहमदनगर दि.१७ जानेवारी (प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा वरती कारवाई करणे कामी पेट्रोलिंग सुरू असताना जामखेड पोस्टे हददीत असतांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अहमदनगर ते जामखेड रोडने जामखेडच्या दिशेने एक पांढ-या आकाशी रंगाचा दहा चाकी हायवा वाळु भरुन चोरुन वाहतुक करीत आहेत. नगर ते जामखेड रोडवरील सहारा हॉटेलच्या समोर जावुन सापळा लावल्यास तो मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने
पोलीस निरीक्षक अनिल कटके, यांच्या आदेशाने पोहेकॉ / ३१८ विश्वास अर्जुन बेरड, पोना / १७७२ लक्ष्मण चिंधु खोकले पोना/३७६ शंकर संपत चौधरी पोकॉ/२५०३ कमलेश हरिदास पाथरूट असे पथक
वरील नमुद पोलीस स्टाफ जामखेड पोस्टे येथुन खाजगी वाहनाने निघुन बातमीतील नमुद ठिकाणी नगर ते जामखेड रोडवरील सहारा हॉटेल समोर जावुन सापळा लावुन थांबलो असता थोडया वेळाने नमुद बातमी प्रमाणे एक पांढ-या आकाशी रंगाचा दहाचाकी हायवा जामखेडच्या दिशेने येताना दिसला खात्री होताच सदर ठिकाणी २२/०० वा सुमारास सदर हायवा वरील ड्रायव्हर यास हातातील बॉटरीच्या प्रकाशाच्या सह्याने थांबवण्याचा इशारा केला असता हायवा वरील चालकाने हायवा रोडच्या पर्यावसरला थांबवला असता हायवा वरील चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव १) अनिल सोमनाथ राळेभात वय २५ वर्षे रा. जमादार वाडी जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर असे २०३ असल्याचे सांगितले व दर हायवा मालकाबाबत पकडलेल्या इसमास विचारपुस केली असता त्याने मालकाचे नाव २) नितीन परमेश्वर आजबे रा. जमादारवाडी, जामखेड ता. जामखेड जिल्हा अहमदनगर असे असल्याचे • सांगितले. वरील वाहनांवरील चालक याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे वाळु चोरी करुन वाहतुक करतांना मिळुन आला आहे. सदर पकडलेल्या वाहनात
१) २०,००,०००/- र कि. चा एक टाटा कंपनीचा २५१८ मॉडेलचा पांढरे रंगाची केबीन व त्यास आकाशी गाची बॉडी असलेला दहा चाकी हायवा त्यावर क्रमांक एमएच ४६ AR ८३३२ असा लिहलेला हायवा जु.वा. किं.अं.
२) ६०,०००/- रु किमतीची ६ ब्रास शासकिय वाळु हायवाच्या मागील हौदामध्ये मध्ये मिळुन
२०,६०,०००/-
वरी वर्णनाची व किमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष सदर हायवा व वाळुचा पंचनामा पोना / १ १७२ लक्ष्मण खोकले यांनी जागीच करुन वरील मुददेमाल जागीच जप्त करुन ताब्यात घेवुन अरोपी व मुददेमाल सह पोलीस स्टेशनला आलो.
वरील चालक नामे १) अनिल सोमनाथ राळेभात वय २५ वर्षे रा. जमादार वाडी जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर व त्याचा मालक २) नितीन परमेश्वर आजबे रा. जमादारवाडी, जामखेड ता. जिल्हा अहदनगर (फरार) यांचे विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल कमलेश हरिदास पाथरूट यांनी भादवि कलम ३७९ प्रमाणे फिर्याद आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके ,पोहेकॉ / ३१८ विश्वास अर्जुन बेरड, पोना / १७७२ लक्ष्मण चिंधु खोकले पोना/३७६ शंकर संपत चौधरी पोकॉ/२५०३ कमलेश हरिदास पाथरूट यांच्या पथकाने कारवाई केली