नगर तालुका पोलिसांचे गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध सलग चार ठिकाणी छापे! नगर तालुका पोलिसांच्या कारवाईत 1,62000 (एक लाख 62 हजार) किमतीचा गावठी दारू सह कच्चे रसायन नष्ट

नगर तालुका पोलिसांचे गावठी हातभट्टी चा
नगर दि. 22 मार्च (प्रतिनिधी ):- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध हातभट्टी चालकावरती कारवाईची मोहीम केली सुरू नगर तालुका पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील साकत गाव व या परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना खात्रीशीर बातमी मिळाली मिळाल्याने तत्काळ पथकासह
स्वतः पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते साकत गावच्या शिवारातील 13/15 सुमारास छापा टाकून हातभट्टी चालक सोमनाथ नारायण पवार राहणार साकत ताजी अहमदनगर याच्या कब्जात 36000 किमती चा गावठी हातभट्टी तयार करण्याची कच्चे रसायनसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला व सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
◀️दुसरी कारवाई साकत गावच्या शिवारात 14/30 छापा टाकला असता आरोपी नामे हरिभाऊ मौला पवार गाव-साकत खुर्द ता .जि.अहमदनगर याच्या कब्जात 38 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले, सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
◀️ तिसरी कारवाई साकत गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात 15/20 वाजता छापा टाकला असता आरोपी नामे सोपान हरिभाऊ पवार गाव- साकत खुर्द ता.जि. अहमदनगर याच्या कब्जात 42 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले व सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ )(क) (ड) (ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
◀️चौथी कारवाई साकत गावच्या शिवारात16/30 पास्ता छापा टाकला असता आरोपी नामे नाव आकाश महिपती पवार गाव,रा साकत ता, जि अहमदनगर याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 46000 रू हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कच्चे रसायन व गावठी हातभट्टी तयार दारू साहित्य मिळून आल्याने ते नष्ट करण्यात आले सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
सदर चार कारवाई मध्ये एकूण एक लाख 62000 किमतीचा मुद्देमाल नष्ट करून चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे ,धुमाळ,शेख ,खरात पालवे ,भालसिंग,जायभाय,शिंदे गोरे ,बोराडे,खेडकर,शिरसाट यांच्या पथकाने कारवाई केली.