खळबळजनक
चंदन तस्कर बाबासाहेब बर्डे याच्यासह 20 जणांच्या टोळीचा माळी कुटूंबावर सशस्त्र हल्ला! जखमी आई, मुलगा यांच्यावर जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु पाथर्डी पोलिसांनी माळी कुटूंबाची घेतली साधी तक्रार, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ पिडीत माळी कुटूंबाने दिले जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर :दि. 25 मे : पाथर्डी तालुक्यातील कौडगाव आठरे येथे लक्ष्मण राजाराम माळी यांच्या कुटूंबावर येथील चंदन तस्कर बाबासाहेब बर्डे याच्यासह 20 जणांच्या टोळीने रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सशस्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी माळी कुटूंबाची साधी तक्रार घेतली. असून गुन्हा दाखल करण्यास पाथर्डी पोलीस टाळाटाळ करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत लक्ष्मण माळी यांचे बंधू रामदास यांनी आपली पत्नी व बहिणीसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. आहे. निवेदनात हल्ला करणारे1) बाबासाहेब शिवाजी बर्डे 2) हिरालाल शिवाजी बर्डे 3)किसन छबू बर्डे 4)आप्पा साहेब बबन बर्डे 5) शरद किसन बर्डे 6)करण अप्पासाहेब बर्डे 7)भैय्या आप्पासाहेब बर्डे 8)पप्पू बबन बर्डे 9)ददल्या पप्पू बर्डे 10)राजेंद्र नभाजी माळी 11)देविदास मिठू बर्डे 12)संदीप अंबादास आठरे 13)अंबादास दादासाहेब बर्डे 14)देविदास दादासाहेब बर्डे 15)रोहिदास दादासाहेब बर्डे 16)सुभाष छबुराव बर्डे 17)अमोल सुभाष बर्डे 18) अरुण भगवान बर्डे 19) सागर अरुण बर्डे 20)अविनाश अरुण बर्डे सर्व राहणार कौडगांव आठरे, तालुका पाथर्डी यांनी कोणतेही कारण नसतांना माझे बंधू लक्ष्मण माळी तसेच माझी वृद्ध आई चंद्रकला राजाराम माळी (वय 70) व बहीण वनिता दशरथ बर्डे यांना रविवार दि. 24 मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तलवारीचा धाक दाखवून लोखंडी रॉड, दांडक्यानी बेदम मारहाण केली.
माझी आई व भाऊ यांच्यावर पाथर्डी येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु असतांना मार जास्त लागल्याने जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी साठी सोमवार दि. 25 रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले . बहीण वनिता बर्डे हिला मारहाण करत तिच्या गळ्यातील 3 ग्रॅम सोन्याचे डोरले, एक सोन्याच्या मन्याची पोत ओरबडून काढत बहिणीस लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील भाषा वापरत शरीर सुखाची मागणी केली.
सदर घटनेतील हत्यारे पाथर्डी पोलिसांनी जमा केली आहेत. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी दि. 24 मे रोजी रात्री दोन वाजता गेलो असता, पोलिसांनी उडवा उडवीची उत्तरे देत नंतर साधी तक्रार घेतील मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचे म्हंटले आहे.
सदर बाबासाहेब शिवाजी बर्डे याचा गावातील हनुमान मंदिरा जवळच दारूचा धंदा असून बाबासाहेब बर्डे हा पाथर्डी तालुक्यात चंदन तस्करी करत असून बर्डे याच्या विरुद्ध बऱ्याच तक्रारी पाथर्डी पोलीस स्टेशनला आहेत. याबाबत आरोपी बर्डे व त्याच्या टोळीविरुद्ध आर्म ऍक्ट, जीवे मारण्याची धमकी, विनयभंग, दरोडा, खून करण्याचा प्रयत्न या कलामा खाली गुन्हा दाखल करून बर्डे टोळी पासून आमच्या कुटूंबास धोका असल्याचे म्हटले असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असून अर्जाची एक प्रत जिल्हाधिकारी अहिल्यानगर व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवीली आहे. सदर अर्जावर रामदास माळी,पत्नी दैवशाला माळी, बहीण वनिता बर्डे यांच्या सह्या आहेत.
या गंभीर प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार का? सदर टोळीच्या मुसक्या पोलीस आवळणार का? माळी कुटूंबाला संरक्षण मिळेल का? एकंदरीतच पाथर्डी पोलिसांच्या कारभारा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याच्या चर्चा पार्थडी तालुक्यातच नव्हे अहिल्यानगर जिल्ह्यातून नागरिकांमधून होत आहेत.



