देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :शेवगाव : दि. 25 मे : मा.श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक सो. अहिल्यानगर यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेशित केले होते. त्या अनुषगाने शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक-24/05/2026 रोजी सायंकाळी 17/00 वाचे सुमारास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेवगाव पोलीस स्टेशन हाददीतील वरुर ते शेवगावकडे इसम जावेद राजु शेख रा. शेवगाव ता शेवगाव हा त्याचे मारुती सुझुकी 800 या चार चाकी गाडीमध्ये महाराष्ट्र राज्यात तंबाखु जन्य पदारर्थाचे विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असणारा सुगंधी तंबाखु व तयार मावा याची वाहतुक करणार आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी लागलीच तपास पथक बोलावुन बातमीतील नमुद हकिगत समजावुन सांगुन तपास पथकाने लागलीच दोन खाजगी पंचासह खाजगी वाहनाने वरुर ते शेवगावकडे येणारे रोडवर सापला लावुन सदर वाहन येत असल्याची खात्री झाल्याने पोलीसांनी सदर वाहन थांबवण्यास सांगितले असता वाहन चालक जावेद राजू शेख रा. शेवगाव ता शेवगाव याने त्याचे ताब्यातील वाहनामधुन उतरुन पोलिसांना पाहुन पळुन गेला. त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी 800 असे वाहन मिळुन आले आहे सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर वाहनात माल मिळुन आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे..
1) 60,000/-रु किं.चा 5 किलो प्रमाणे 20 पाकीटे त्यामध्ये सुगंधीत तंबाखु प्रत्येक पाकीट किंमत 3,000 रू अं.
2) 7,500 /- रु किं.चे 500 ग्रॅम वजनाचे 30 पाकीटे त्यामध्ये सुगंधीत तंबाखु प्रत्येक पाकीट किंमत 250 रू अं.
3) 3,000 /- रु किं.चा 3 किलो तयार मावा अंदाजे.
4) 1,50,000/- रू किं.ची एक पांढऱ्या रंगाची मारूती 800 सुझुकी कंपनीची कार तिचा नंबर एम एच 12 बी व्ही 9141 असा असलेली जं.वा.की.अं.
2,20,500/- रु एकुण
येणे प्रमाणे वरील मुद्देमाल इसम जावेद राजु शेख रा. शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांच्या ताब्यातील वरील नमुद गाडीमध्ये मिळुन आला आहे. सदर इसमाच्या विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक 441/2026 भा. न्या. संहिता 123,223,274,275 प्रमाणे दिनांक 25/05/2026 रोजी पोकों 03 शाम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादी वरुन शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीरज राजगुरू सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री संतोष मुटकुळे सो, पोसई बाजीराव सानप, पोसई रामहरी खेडकर, पोहेकॉ आजीनाथ खेडकर, पोकों शाम गुंजाळ, पोकों भगवान सानप, पोकों एकनाथ गर्कळ, पोकों राहुल खेडकर, पोकों नकुल फलके, पोकों रोहित पालवे, पोकों वसंत वैद्य, पोकों प्रशांत आंधळे, पोकों ईश्वर बेरड, पोकों राजु बडे, पोकों संपत खेडकर यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोसई रामहारी खेडकर हे करत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा