देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 16 मे : मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, सतिष भवर चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करुन गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 15/05/2026 रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्येे पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत चांदा गावत बस स्टॅन्ड समोरील कॉम्पलेक्सच्या पाठीमागील काटवनात काही गोवंशीय जिवंत जनावरे हे कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दयतेने बांधुन ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली.
पथकाने तात्काळ बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी गोवंशीय जिवंत जनावरे हे चारा पाण्याविना निर्दयतेने बांधुन ठेवल्याचे दिसुन आले. तसेच एक पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांचे मास मिळुन आले. पथकाने सदर जनावरे गोमांस याबाबत आजुबाजुचे लोकांकडे विचारपुस करता, त्यांनी सदरचे जनावरे हे 1) लियाकत इस्माईल कुरेशी 2) साजिद इस्माईल शेख व इतर यांचे असल्याचे सांगितले.
पथकाने सदर ठिकाणावरुन 2,10,000/-रु किमंतीचे 13 जिवंत गोवंशीय जनावरे, 33,000/- रु कि.ची 150 किलो गोमांस असा एकुण 2,43,000/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपीविरुध्द सोनई पोलीस ठाणे गु.र.नं.196/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271,325, 3(5) प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(ब), 5(क), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करीत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंदे चालु असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणे बाबत नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा