राजकिय

कोट्यवधी खर्चूनही पाणी नाही ; मनपाचा छुप्या पद्धतीने पाणीपट्टी दरवाढीचा डाव — किरण काळेंचा आरोप

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर :दि. 23 एप्रिल :वाढीव पाणी पट्टी दरांमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. सेवा शून्य, मात्र दरवाढ पूर्ण आहे. वेग वेगळ्या पाणी योजनांवर आजवर कोट्यवधी खर्चूनही ३६५ दिवस, मुबलक आणि स्वच्छ पाणी नाही. त्यामुळे पाणी पट्टी वाढीचा नैतिक अधिकार मनपाला नाही. प्रति वर्ष दोनशे रुपयांची वाढ करून मनपाचा छुप्या पद्धतीने पाणीपट्टीच्या वारेमाप दरवाढीचा डाव सुरू असल्याचा आरोप, ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे.
शहरातील पाणीपट्टी दरवाढ तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाकडे विरोधी पक्षांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी संजय झिंजे, मनोज गुंदेचा, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, रावजी नांगरे, पै. दीपक भोसले, राम वाणी, राम झिने, चंद्रकांत उजागरे, संजय कांबळे, राम धोत्रे, उषा भगत, शारदा वाघमारे, मीना रणशूर, विकास भिंगारदिवे, किशोर कोतकर, शंकर आव्हाड, विनोद शिरसाट, माजी नगरसेवक फैयाज शेख, हाफिज सय्यद, धनंजय देशमुख, गणेश आपरे, आकाश आल्हाट आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, आजवर फेज १, फेज २ आणि अमृत योजने अंतर्गत तीनशे कोटींपेक्षा अधिक खर्च झाला. मात्र, तरीही अनेक भागांमध्ये नियमित व पुरेसा पुरवठा होत नाही. घरगुती वापरासाठी ९०० ते ४००० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून, दरवर्षी २०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पुढील पाच वर्षांत छुप्या पद्धतीने सुमारे १७०० रुपयांची अतिरिक्त वाढ होणार आहे. ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे पाणीपट्टी दरवाढ लागू करू नये. तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेत तात्काळ सुधारणा करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून करदात्यांची दिशाभूल :
पाणीपट्टीत कपात करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी मूळ दरवाढीचा या पूर्वीचा ठराव कायम ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून करदात्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप, किरण काळे यांनी केला आहे.
स्मार्ट सिटी म्हणता, पण शहर टँकर मुक्त कधी करणार ? :
महापालिका स्थापन होऊन दोन दशकांहून अधिक काळ झाला. तरी आजही काही भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा खर्च केला गेला आहे. याही वर्षी सुमारे अडीच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यावरून पाणी वितरण व्यवस्थेत किती गंभीर त्रुटी आहेत हे लक्षात घेतल पाहिजे. लोकप्रतिनिधी, प्रशासन शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू असल्याचे कायम दावे करतात. पण त्याआधी शहर टँकर मुक्त कधी करणार?, असा सवाल किरण काळे यांनी केला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे