सामाजिक

आंबेडकर नगर मित्र मंडळ माळीवाडा यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी आभिवादन आमदार संग्राम भैय्या जगताप यांची प्रमुख उपस्थिती

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर. दि. 17 एप्रिल : महामानव, विश्वरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती राज्यात, परराज्यात व विदेशा मध्ये मोठया प्रमाणात साजरी केली जाते.
अहिल्यानगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी शहरातील भिमसैनिक व आंबेडकरी जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आभिवादन केले.
शहरातील माळीवाडा येथील आंबेडकर नगर येथील मित्र मंडळाने नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत आभिवादन केले.
यावेळी प्रभाग 13 चे नगरसेवक अविनाश तात्या घुले, नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे, नगरसेवक गोरख शेठ पडोळे,सुजित घंगाळे, राहुल आल्हाट,समीर भिंगारदिवे,याकूब वडागळे,प्रणव पाडळे,प्रकाश विधाते,संदीप आल्हाट, रवी शिंदे,रवी कर्डक, गणेश सोनवणे,मनोज साळवे बाळासाहेब नवगिरे आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी आंबेडकर नगर मित्र मंडळाच्या वतीने आमदार संग्राम भैय्या जगताप व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे