सामाजिक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्राट अशोक युवा प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या वतीने आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते अन्नदान

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दिनांक 15 एप्रिल : विश्वरत्न कोटी कुळांचे उद्धारकर्ते, महामानव, भारताच्या संविधानाचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी राज्यातच नव्हे तर परराज्यात व परदेशात सुद्धा मोठ्या उत्साही आणि आनंदाने साजरी झाली.
अहिल्यानगर शहरात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. सम्राट अशोक युवा प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या वतीने माळीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अन्नदान कार्यक्रमाचा शुभारंभ नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव, प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य सुरेशभाऊ बनसोडे, नगरसेवक मयूर बांगरे,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सम्राट अशोक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित केदारी, उपाध्यक्ष सागर वंजारे, कार्याध्यक्ष रितेश केदारी, संयोजक रवी साठे, स्वप्निल वंजारे, प्रमोद थोरात, विशाल साठे, संतोष साळुंखे, जगदीश गायकवाड, अक्षय वंजारे, व परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे