देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 17 एप्रिल : विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, भारताच्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती संपूर्ण देशात व विदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर साजरी केली.
भिंगार शहरात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.भिंगार येथील पंचशील नगर येथे बोधिसत्व प्रतिष्ठान, पंचशील नगर यांच्यावतीने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांच्या भव्य भीम गीताचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बौद्ध वंदना घेण्यात आली.
त्यानंतर भिंगार शहराचा बुलंद आवाज असलेले कालकथित पॅंथर एकनाथ उर्फ नाथा भिंगारदिवे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
त्यानंतर भव्य भीम गीतांच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी “व्हीआयपी राहणं व्हीआयपी खाणं, दिल बाबासाहेबांन”, “चांद भी शर्माये जब बाबा मुस्कुराये, चाँद पर भी दाग है पर मेरे भीमराव पर कोई दाग नही”, “भले भले महारथी जिथे झुकतात असा भीमराव घटनापती ” “चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भिमराया ” अशा अनेक भीम गीतांनी पंचशील नगरच नाही, तर भिंगार दुमदुमले, संपूर्ण वातावरणच भिममय झाल्याचे चित्र दिसत होते.
आभार वृद्ध तरुण महिला तसेच लहान मुले यांची अभूतपूर्व गर्दी या कार्यक्रमात पहावयास मिळाली.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसाद भिंगारदिवे, सुदर्शन भिंगारदिवे, सुनील भिंगारदिवे, प्रा. सुहास धिवर सर, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे प्रा. जयंत गायकवाड, देशस्तंभ न्यूजचे महेश भोसले, नगरसेवक मयूर बांगरे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे सिद्धार्थ आढाव, अक्षय भिंगारदिवे, संदीप पारधे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोधिसत्व प्रतिष्ठान पंचशील नगरचे अध्यक्ष आशिष भिंगारदिवे, उपाध्यक्ष सोनू थोरात कार्याध्यक्ष अजिंक्य भिंगारदिवे सचिव पंकज शेलकर खजिनदार अजय शिंदे तसेच
रामदास भिंगारदिवे, संतोष धिवर, संदीप थोरात, सनथ भिंगारदिवे, मयुर भिंगारदिवे,विकी बोरगे, अनिरुद्ध भिंगारदिवे, प्रज्वल पवार, निकेतन शिरसाट, भाग्येश बोराडे, किरण गायकवाड, सुमीत भिंगारदिवे, श्रेयस गायकवाड, हर्षल गायकवाड, यश गायकवाड, सोमनाथ भिंगारदिवे, रुतीक धिवर, आदित्य गजभिव, शुभम मिसाळ, रोहन सदाफुले, शिवम वावरे, योगेश आंग्रे, सोहम उबाळे, रोहन उबाळे, सार्थक धिवर, आदित्य कदम, उत्कर्ष धिवर, आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा