सैनिक बँकेतील त्या नियमबाह्य वाढविलेल्या १४०० सभासदां मुळेच सत्ताधारी मंडळाचा विजय- विक्रमसिहं कळमकर

टाकळी ढोकेश्वर
-देवदत्त साळवे, प्रतिनिधी-
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी काल पार पडली यावेळी सत्ताधारी सहकार पॅनलने सर्व सहा जागा जिंकत विजय मिळवला असला तरी परिवर्तन पॅनल ने मिळवलेली मते कौतुकास्पद आहेत. तसेच श्रीगोंदा व जामखेड येथील परिवर्तन पॅनलला मिळालेलं मताधिक्य उत्साह वाढविणारे असल्याचे परिवर्तन मंडळाचे नेते विक्रमसिंह कळमकर यांनी सांगितले.
सत्ताधार्यांनी अस्तित्वहीन समजलेल्या परिवर्तन मंडळाला मिळालेली मते सत्ताधाऱ्यांवर नाराजी दाखवणारी व विरोधकांना पुढील वाटचालीस बळ देणारी आहेत. सत्ताधारी मंडळाचे चेअरमन शिवाजी व्यवहारे व काही कर्मचारी यांनी सत्ता टीकावी म्हणून लोकशाहीची हत्या करत एकाच रात्रीत तब्बल १४०० नातेवाईकांना सभासदत्व बहाल केल्यानेच त्यांना विजय मिळविता आला,अन्यथा आज निकाल वेगळा दिसला असता. यापूढे सभासदांचे हित जोपासत बँकेच्या प्रगतीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाला सहकार्य करू तसेच चुकीच्या कामांना प्रखर विरोध करणार असल्याचे विक्रमसिंह कळमकर, दत्तात्रय भुजबळ, विनायक गोस्वामी, दीपक गायकवाड, संतोष राक्षे, निलेश तनपुरे, आनंदा रणदिवे यांनी सांगितले.
*संतोष राक्षे, दीपक गायकवाड यांची श्रीगोंदा,जामखेड मध्ये आघाडी !*
श्रीगोंदा येथील परिवर्तन मंडळाचे उमेदवार श्री. संतोष शहाजी राक्षे यांनी श्रीगोंदा तालुक्यातुन व जामखेड येथील उमेदवार श्री. दीपक जिजाबा गायकवाड यांनी जामखेड तालुक्यातून परिवर्तन मंडळाला आघाडी दिली त्यामुळे या तालुक्यातील सभासदांच्या मनातील परिवर्तन पॅनलचेच उमेदवार खरे संचालक असल्याचे मत विक्रमसिंह कळमकर यांनी व्यक्त केले.
*व्यवहारे यांच्या कारभारावर सभासदांची नाराजी !*
विद्यमान चेअरमन यांना दत्तात्रय भुजबळ यांनी दिलेली कडवी लढत व इतर विजयी उमेदवारांपेक्षा व्यवहारे यांचे घटलेलं मताधिक्क पाहता व्यवहारे यांच्या कारभारावर सभासदांची नाराजी स्पष्ट दिसत आहे.
आमच्या परिवर्तन मंडळाला सैनिक बँकेच्या जडणघडणीत योगदान असणारे तमाम पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेडसह इतर तालुक्यातील मतदारांनी चांगली मते दिल्याबद्दल परिवर्तन पॅनलच्या वतीने सर्व मतदारांचे आभार मानून लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविलेल्या उमेदवारांना पुढील काळात यश नक्कीच मिळेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला.