देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर:दि. 22 नोव्हेंबर: (प्रतिनिधी)- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी मन सुन्न करणारी घटना घडली आहे. केवळ तीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या पाशवी कृत्यानं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच मालेगाव सामान्य रुग्णालयात संतप्त नागरिक, नातेवाईकांची मोठी गर्दी करून. आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर समाजातील वाढत्या अत्याचारांवर गंभीर चिंता व्यक्त करत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अँड स्वाती जाधव यांनी सांगितले की, या अक्रोशाने जरी आपल्या काळजाचा ठोका चुकत नसेल, तर आपण माणूस म्हणून जगण्याची लायकीही नाही. कँडल मार्च, निवेदनं, आश्वासनं नकोत; अशा नराधमांना भर चौकात कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय समाज सुरक्षित होणार नाही. लेक असलेल्या प्रत्येक आई-वडिलांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्य ा या घटना रोखण्यासाठी स्वसंरक्षण अत्यावश्यक आहे. जशे प्रत्येक मुलीच्या हातात मोबाईल असतो, तशीच तिच्या हातात लाठी, काठी, तलवार, दांनपट्टा व भाला हाताळण्याची ताकदही असणे काळाची गरज आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस कृती करत जिजाऊ ब्रिगेडतर्फे अहिल्यानगरमध्ये १ डिसेंबरपासून सर्व महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात लाठी-काठी चालवणे, तलवारबाजी, ढाल व दांनपट्टा तंत्र, भालाबाजी, शारीरिक आणी मानसिक सक्षमीकरण या सर्वांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
*अन्याय सहन करण्याची वेळ संपली.*
आजच आपली लेक, बहिण, आई बलवान करा. मनगटाला मनगट धरून उभं राहिल तरच नराधमांना रोखता येणार असल्याची भावना जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अँड स्वाती जाधव यांनी व्यक्त केली त्यामुळे ही घटना समाजाला हादरा देणारी असून मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनासह प्रत्येक नागरिकाने जागरूक होण्याची गरज आहे. स्वसंरक्षण हाच काळाचा सर्वात मोठा कवच असल्याचा संदेश जिजाऊ ब्रिगेडने दिला आहे. प्रशिक्षणासाठी नाव नोंदणीसाठी *संपर्क 9922289170*
*अँड स्वाती जाधव*
*जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष*
*अहिल्यानगर*
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा