सामाजिक

पोलीस अधीक्षक कार्यालयावर सकल मातंग समाजाचा मोर्चा हल्लेखोर सराईत गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी.

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर (प्रतिनिधी)– श्रीरामपूर शहरात घडलेल्या भीषण घटनेच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने समाजबांधवांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, मातंग समाजातील निष्पाप युवक साई साळवे, रुद्र जगधने व भोलू गुप्ता यांच्यावर मुस्लिम समाजातील सराईत गुंड साहिल सय्यद व शाहिद सय्यद यांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही युवक रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वीही या सराईत गुंडांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र श्रीरामपूर पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळेच या आरोपींचा धीर वाढून त्यांनी मोठा गुन्हा केला असल्याचा आरोप निवेदनात व्यकत करण्यात आला आहे.
आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी या मोर्चातून करण्यात आली.
या मोर्चात अंकुश मोहिते, सुनील उमाप, संजय चांदणे, दीपक पाचारणे, जय भोसले, राम वडागळे, पोपटराव पाथरे, आकाश भोसले, अशोक भोसले, यशोदास वाघमारे, सागर साठे, नितीन खंडारे, दीपक सरोदे, नामदेवराव चांदणे, हिना उबाळे, विलास ससाने, सागर उबाळे, रोहित जोशी, स्वप्निल साळवे, सुनील ढोले, राहुल ठोकळ, पप्पू पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे