देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि.16 सप्टेंबर: अहिल्यानगर नगर शहराचे कार्यसम्राट, हिंदूधर्मरक्षक आमदार संग्राम भैय्या जगताप यांची तरुण वर्गात मोठी क्रेझ आहे. त्यांच्या कार्यामुळे दिवसेंदिवस अनेक तरुण त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षात येत आहेत.
तरुण नेतृत्वाला पक्षाच्या चांगल्या पदावर काम करण्याची संधी आमदार संग्राम भैय्या तरुणांना देत आहेत.
सक्षम भैय्या राजेश जाधव यांच्या कामावर प्रभावित होऊन आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी सक्षम जाधव यांची राष्ट्रवादी युवा शहर उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड केली आहे. तसे नियुकीपत्र नुकतेच आमदार जगताप यांनी सक्षम राजेश जाधव यांना दिले.
यावेळी आमदार जगताप यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिले.
जाधव यांच्या निवडीमुळे नगर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा