निधन

संबोधी विध्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक नितीन कसबेकर यांचे अपघाती निधन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 29 ऑगस्ट : समाजाच्या सुख दुःखात नेहमीच सक्रिय असणारे बहुजन शिक्षण संचलित संबोधी विध्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील आमचे सहकारी बंधू पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जेष्ठ नेते, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन प्रभाकर कसबेकर (वय, 50) यांचे काल रात्री अपघाती निधन झाले.
त्यांच्या पक्षात पत्नी तीन मुली, नातेवाईक, कार्यकर्ते, मित्र असा मोठा परिवार असून ते प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार प्रीतमकुमार कसबेकर यांचे छोटे बंधू होत. त्यांच्या अकाली जाण्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील समग्र आंबेडकरी चळवळ, बहुजन शिक्षण संघ परिवारा मधून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी सिद्धार्थनगर येथील ख्रिस्त कब्रस्तान येथे दुपारी 12 वाजता होणार आहे.
फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ, बहुजन शिक्षण संघ परिवार व देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे