सामाजिक

गेल्या पंधरा वर्षापासून चौभे कॉलनीतील प्रश्न सोडवत आहे : सुनील शिंदे जिथे अन्याय होतो, तिथे रिपब्लिकन सेना पाठीशी उभी राहील संजीवनी राजपूत यांची महिला शहर कार्याध्यक्षपदी निवड

देशस्तंभ ऑनलाईन न्युज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 7 ऑगस्ट :मला सामाजिक कामाची आवड असल्यामुळे मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून चौभे कॉलनीतील प्रश्न, समस्या सोडवित आहे. असे मत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे यांनी उपनगरातील बोल्हेगाव, गांधीनगर परिसरातील नागरिकांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले इथे आजही भरपूर समस्या आहेत कचरा गाडी वेळेवर येत नाही, ड्रेनेजची समस्या आहे, रस्त्याची मोठी समस्या आहे. याबाबत वेळोवेळी तुमच्या समवेत आपण आमदार संग्रामभैय्या जगताप यांना भेटून निवदने दिली आहेत त्यांनी देखील या समस्या सोडविल्या जातील अशी आश्वासने दिली आहेत.
जिथे जिथे अन्याय होतो, तिथे तिथे रिपब्लिकन सेना नागरिकांच्या पाठीशी उभी राहील, यासाठी तुमच्यातील एकजूट ही खूप महत्वाची आहे.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक बेबीताई टकले, शहर अध्यक्षा सुनीता शिंदे, शहर उपअध्यक्षा नेहा जावळे, सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, बाळासाहेब कसबे, गणेश परहार, शिवाजी थोरात, गणेश कोकडे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना शिंदे म्हणाले,या भागात तीनशे ते साडे तीनशे कुटुंबे राहतात त्यांना आजही त्यांच्या नावाचा जागेचा उतारा निघत नाही, त्यासाठी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनानी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या भागातील सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी राजपूत यांची महिला आघाडीच्या शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी रविदास उरुणकर, आकाश करपे,सविता काळे, सुवर्णा ताबिले, उज्वला माळवे, सविता कवडे, शितल घोरपडे, मनिषा यादव, प्रवीण जाधव, हसीना सय्यद, मेघा परदेशी तसेच परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्षा नेहा जावळे यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे