सामाजिक

जामखेड साठेनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ वी जयंती मोठया उत्साहात

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : जामखेड प्रतिनिधी रोहित राजगुरू
मोः7517835005
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ वी जयंती निमित्त खर्डा रोड जामखेड येथील साठे नगर येथे भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली . यावेळी डॉ .बाबासाहेब आंबेडकर वसाहितचे लिपिक अधिकारी . मधुकर महानवर सर . व सामाजिक कार्यकर्ते जमीर भाई सय्यद यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले , माणूस कोणत्या कुळात कुठल्या वर्गात जन्माला येतो याच्या पेक्षा त्याचे कर्तृत्व किती मोठे आहे. याच्यावर तो माणूस किती श्रेष्ठ आहे. हे कळतं या व्यवस्थेने ज्याला अस्पृश्य ठेवलं गावाच्या बाहेर ठेवले. कुठल्याही प्रकारचे ज्ञान घेता येत नाही लिहीता येत नाही. तुम्ही अस्पृश्य आहे असे म्हणून ज्यांना हिनवलं अशा परिवारामध्येच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पोवाडा महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिला तर अण्णाभाऊ साठे यांनी तो गायला अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले साहित्य साता समुद्रा पलिकडे विदेशात गेले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी देशातील गोरगरीब, शेतकरी, कामगार, महीला अशा विविध क्षेत्रातील तळागळातील वंचिताच्या व्यथा वास्तव व्यवस्थेकडे मांडण्याचे काम त्यांनी आपल्या लेखणीतून केले.
पैसा तसेच न्याय व्यवस्थेवर प्रखर पणे लिहून लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यानी केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगरसेवक अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष महेश दादा निमोणकर , नगरसेवक पवनराजे राळेभात, नगरसेवक गणेश आजबे, संजय काशिद, समाज कार्यकर्ते संतोष गव्हाळे .विकी घायतडक सर .तात्यासाहेब बांदल, सामाजिक कार्यकर्ते जमीर सय्यद, किशोर कांबळे .सदाफुले, सचिन अण्णा सदाफुले, नगरसेवक मोहन पवार, सामाजिक कार्यकर्ते नासीर चाचू सय्यद , विक्रांत घायतडक, सिद्धांत डाडर राज शिंदे, रवि डाडर .मनोज डाडर, दादाआडगळे . प्रेम कांबळे . सोनू क्षिरसागर .कृष्णा शिरसागर .सुमित डोलारे .दादा डाडर .आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे