देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : शिर्डी : दि. 21 जुलै: अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या व रणरागिणी मल्टीपर्पज फाउंडेशन च्या संस्थापिका सौ . रोहिणी पवार यांनी महिला सशक्तीकरण, सबलीकरण व बचत गटांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत राज्यस्तरीय समाजरक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .
सदर पुरस्कार त्यांना नुकताच शिर्डी येथे आयोजीत अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीने सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला .
सौ रोहीणी संजय पवार यांनी अहिल्यानगर जिल्हयात शैक्षणिक सामाजिक उद्योजकता विकास महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण ग्रामविकास बालविकास संस्थेचे कार्य आहेत. महिलांविषयी त्यांना विविध क्लासेस शिकवणे महिलांची वेळोवेळी अडचणीत मदत करत सोडवणे, गृह उद्योग निर्मिती करून देणे त्यांना रोजगार मिळवून देणे , त्यांचे बचत गट स्थापन करून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आपण विविध मशिनरी उपलब्ध करून देणे.
तसेच शाळेमध्ये जाऊन गोरगरीब मुलांना शालेय साहित्य , कपडे वाटप करणे, रक्तदान शिबिर घेणे , हॉस्पिटलमध्ये जाऊन गोरगरीब पेशंट त्यांना फलाहार देणे, असे सामाजपयोगी कार्य केले आहे . याची नोंद घेत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांचे हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले .
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा