सामाजिक

27 जुलै 1985 रोजी महाराष्ट्राच्या विधी मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव प्रारित झाला, त्याच दिवशी 27 जुलै 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाईल : आमदार संग्राम जगताप

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 5 जुलै (प्रतिनिधी ) 27 जुलै 1985 रोजी महाराष्ट्राच्या विधी मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव प्रारित झाला, त्याच दिवशी 27 जुलै 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाईल असा आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समितीच्या बैठकीत व्यक्त केला. या बैठकीचे अध्यक्षस्थान जेष्ठ नेते विजय भांबळ हे होते. यावेळी समितीचे सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक अजय साळवे, प्रा. जयंत गायकवाड, सुनील शिंदे, महेश भोसले, शिवाजी भोसले, नाथाभाऊ आल्हाट, नितीन कसबेकर, संजय जगताप, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, सुमेध गायकवाड, ऍड. संदीपकुमार पाखरे,अजय भिंगारदिवे सर, सिद्धार्थ आढाव, किरण दाभाडे,शिवाजी साळवे, विशाल भिंगारदिवे, विशाल कांबळे, सुरेश भिंगारदिवे,येशूदास वाघमारे, संजय जगताप, पोपट जाधव, दिपक लोंढे,गणेश गायकवाड, संघा गायकवाड, अंकुश मोहिते, संजय साळवे,विशाल कांबळे, दिनेश पंडित, सागर ठोकळ, प्रदीप शेलार, शनेश्वर पवार, दया गजभिये,सागर विधाते, सुनीता साळवे, गौतमी भिंगारदिवे, रंजना गायकवाड, तेजस्विनी साळवे, धनवर्षा नायडू,आदी कार्यकर्ते व समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार जगताप म्हणाले, अहिल्यानगर शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा यासाठी बऱ्याच वर्षापासून संघर्ष होता. नगर शहराच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, असेच सर्व शासकीय कार्यालय नवीन होत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ही सर्व नगर शहरातील नागरिकांची भावना होती, यासाठी मला लोकशाहीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधाना नुसार आपण दिलेल्या मताच्या आशीर्वादाने मला तिसऱ्यांदा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली.
मी शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या घोषणा ऐकल्या आहेत, पण जय मीम ही घोषणाच मला कळाली नाही. येणाऱ्या 27 जुलै रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा सोहळ्यास सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीचे सिद्धार्थ आढाव यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जयंत गायकवाड यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे