गुन्हेगारी

घातपात की आत्महत्या?

तरुणाचा मृत्यू संशयास्पद!नागरिकांमधून चर्चा

अहमदनगर(प्रतिनिधी) नगर शहरापासून जवळच असणाऱ्या नगर सोलापूर रस्त्यावरील हरीमळा येथे अवघ्या सोळा वर्षाच्या सिद्धार्थ सुरेश वाघमारे या तरुणाचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला.
घटना त्या कुटुंबातील आई वडिलांसह नागरिकांना चुटपुट लावणारी आहे.आणि ती चुटपुट लागणे स्वाभाविक आहे. त्याचे महत्वाचे कारण त्या तरुणाचे असलेले वय त्याच्या या अकाली जाण्याने आई वडिलांसह, नागरिक व फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे घातपात की आत्महत्या?
वडील सुरेश वाघमारे हे डबडबलेल्या डोळ्यांनी सांगत होते.आपला मुलगा नेहमीप्रमाणे घरातील काम उरकून जनावरे चारायला घरापासून जवळच असलेल्या रानात गेला.सायंकाळ झाली,अजून कसा येईना म्हणून आम्ही सर्व वाट पाहत होतो.वाट पहात असताना घराकडे फक्त जनावरे आली.पण मुलगा काही दिसला नाही. म्हणून सायकलवर ज्या ठिकाणी रानात जनावरे चारायला जात त्याठिकाणी वडील सुरेश व त्यांचे बंधू हे सिद्धार्थ ची शोधाशोध करायला लागले.तिथे काट्यात मुलाचे शव कमरेच्या पट्ट्याने लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यावर पायाखालची जमीन सरकली. त्याचदिवशी शनिवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्री येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पण तो आहे त्याठिकाणी रानात मृत्यू पावला होता.
रविवारी दुपारी साधारणपणे बारा ते साडेबाराच्या आसपास पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले. पण वडिलांसह सर्व नातेवाईक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या चर्चेतून एकच सूर उमटत आहे.सिद्धार्थ चे कुणाशी शत्रुत्व नव्हते,बर त्याला घरचेही काही टेन्शन नव्हते. मग त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली.
शनिवारपासून रविवारी अंत्यसंस्कार होईपर्यंत सिद्धार्थचा मृत्यू घातपात की आत्महत्या ? अर्थात हा सर्व पोलीस प्रशासन च्या तपासाचा भाग आहे. या घटनेची सद्या तरी अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे. या घटनेचा पोलिसांनी कसून तपास करणे महत्त्वाचे आहे. याप्रकरणी वडील सुरेश वाघमारें सह हरीमळा परिसरातील नागरिक व फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तीन चार दिवसांत प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या सिद्धार्थ च्या मृत्यूबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटण्याच्या पावित्र्यात आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे