गावठी कट्टा दाखवुन धमकी देणा-यांस कोतवाली पोलीसांनी केले गजाआड!

अहमदनगर दि.७ (प्रतिनिधी)
केडगाव येथील एका महिलेला गावठी कट्टा दाखवून धमकी देणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.
अटक केलेल्या आरोपी कडून कोतवाली पोलिसांनी तीन जिवंत काडतुसे व एक गावठी कट्टा हस्तगत केल्याची कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे.
याबातची अधिक माहिती अशी की,
वंदना अशोक भिंगारदिवे यांच्या घरी येऊन नितीन शेलार याने धमकी दिली. की तुमच्या मुलाने माझ्या पुतनीला पळवुन नेवुन तिच्याशी लग्न केले आहे . त्यामुळे आमची बदनामी झालेली आहे .असे म्हणुन गावठी कट्टा दाखवून जीवे मरण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी वंदना भिंगारदिवे यांच्या मुलाने 112 वर पोलिसांना माहिती कळवली होती. त्या नुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी तातडीने गुन्हे शोध पथकासह घटनास्थळी जाऊन आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले. तसेच त्याच्या गाडीच्या डिक्कीत असलेला गावठी कट्टा तसेच ३ जिवंत काडतुसे असे ताब्यात घेवुन आरोपीला अटक करण्यात आले.
या प्रकरणी नितीन शेलार याच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन येथे आर्म अँक्ट प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास हा सपोनि रविंद्र पिंगळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक संपतराव
शिंदे, पोसई गजेंद्र इंगळे, चापोहेकाँ सतिश भांड, पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे ,पोना योगेश कवाष्टे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोना राजु शेख, पोकाँ अभय कदम, पोकाँ दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ सोमनाथ राउत, पोकाँ अतुल काजळे, पोकाँ संदिप थोरात, पोकाँ राजेंद्र केकान, पोकाँ राजेंद्र फसले यांनी केली आहे.