पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा
अहमदनगर दि. 13 (प्रतिनिधी) :-महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता जळगाव विमानतळ येथून शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.50 वाजता शिर्डी येथून वाहनाने घोडेगाव, ता. नेवासाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता घोडेगाव, ता. नेवासे येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर घोडेगाव नळ पाणी पुरवठा योजना प्रशासकीय मान्यतेची उदघोषणा. सकाळी 11.30 वाजता घोडेगाव येथून शनिशिंगणापूर, ता. नेवासाकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता शनिशिंगणापूर येथे आगमन, शनि महाराजांचे दर्शन व राखीव. दुपारी 12 वाजता शनिशिंगणापूर येथून आमराई गेस्ट हाऊस, सोनई, ता. नेवासाकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता आमराई गेस्ट हाऊस सोनई येथे आगमन व अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत शिवसंवाद बैठक. दुपारी 1 वाजता राखीव. दुपारी 2 वाजता आमराई गेस्ट हाऊस, सोनई येथून वाहनाने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता शिर्डी विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.