राजकिय
संग्रामच्या विजयासाठी सुजयची मिठी….. प्रचाराची हलगी कडाडली…. उपनगराच्या विकासात्मक कामातून जनता महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचार रॅलीत स्वयंफुर्तीने सहभागी….


उपनगरात निघालेल्या प्रचार रॅलीस नगरकरांचा उत्साह दिसून आला. तर जेसीबीद्वारे हलगीच्या निनादात फुलांचा वर्षाव करण्यात आला. महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
प्रचारासाठी आलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जगताप यांची गळाभेट घेतली.यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व या भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.