देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : (पारनेर : दि. 7 नोव्हेंबर )’ मैं एक तो कमेंटमेंट करता नही, और कमेंटमेंट किया तो मैं खुद की भी नहीं सुनता ‘ सुजितराव तुमच्याकडे धनादेश नाही, परंतु घाबरू नका, चिंता करू नका, कारण जनादेश आहे. आणि आता तुम्ही शिवसेनेत आलात आता एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी उभा आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेर येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील 26 विद्यमान सरपंचासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
यावेळी नेवासा मतदार संघांचे आमदार विठ्ठलराव लंघे, संगमनेर मतदार संघांचे आमदार आमदार अमोल खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, बाबुशेठ टायरवाले, संदेश कार्ले, राम रेपाळे, प्रा. विलास साठे सर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे,जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, संजय ताकवले,बाळासाहेब कसबे, गणेश कोकडे, रमेश उरुणकर, ,महिला आघाडीच्या बेबीताई टकले,सुनीता शिंदे, नेहा जावळे, जाधव मावशी, रुपाली आयची , तसेच अहिल्या नगर शहरातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारनेर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले, मी लवकर येणार होतो, परंतु आपल्या तालुक्यात पिपंळखेर येथे बिबटयाची दुर्घटना झाली तेथे गेलो. बिबट्याच्या हल्ल्यावर सरकार पूर्णविराम दिल्याशिवाय राहणार नाही. ते पुढे म्हणाले सुजितराव आपल्या पक्ष प्रवेशासाठी मी इथे आलो आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण म्हणजे सुजित झावरे पाटील यांच्या रूपाने आपण पाहत आहोत. माझी खरी ओळख राज्यातील अडीच कोटी बहिणीचा लाडका भाऊ हिच आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. असे त्यांनी सांगत पारनेर तालुक्यातील विविध विकास कामांना निधी कमी पडू देणार नसल्याच्या भावना त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर व्यक्त केल्या. यावेळी पारनेर तालुक्यातील वाडया, वस्त्यांवरून नागरिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा