राजकिय
आमदार संग्राम जगताप यांच्या नगरविकास यात्रेला प्रभाग क्रमांक 12 मोठी गर्दी! छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांच्या पुतल्यास केले अभिवादन! माळीवाडा येथील ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात केली पूजा


यावेळी त्यांचे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक अविनाश तात्या घुले,जेष्ठ नेते सुनील शिंदे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,समीर भिंगारदिवे, अंकुश मोहिते, येशूदास वाघमारे, बाळूभाऊ भोंबाळ, आदी उपस्थित होते.
माळीवाडा येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचा फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीच्या वतीने सत्कार करण्यात आला,
यावेळी सुरेशभाऊ बनसोडे, जेष्ठ नेते सुनील शिंदे,आरपीआय आठवले गटाचे माजी नगरसेवक अजय साळवे, सुजित घंगाळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सुमेध गायकवाड,नितीन कसबेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर ) गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख रोहित आव्हाड आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 12 मधील अण्णाभाऊ साठे वसाहतीत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
त्यांनतर मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्यास पुष्पहार अर्पण करत आभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभाग क्रमांक 12 मधील कोहिनुर, गोवर्धन, कुंदननगरी, आदी भागातील नागरिकांशी संवाद साधत माळीवाडा येथील बौद्ध वस्तीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आभिवादन केले,
त्यानंतर माळीवाडा वेशी जवळील क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांना आभिवादन करण्यात आले.
येथील ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
माळीवाडा वेशीजवळ त्यांना जेसीबीतून गुलाब पुष्पाचा हार घालत फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या महिला जिल्हा अध्यशा रेश्मा आठरे, साधनाताई बोरुडे, सुनंदा कांबळे, सुनीता पाचारणे,रुबीना खान, शितल राऊत, शीतल गाडे, अंकुश मोहिते, जाकीर तांबोळी, रामभाऊ काते, संजय दिवटे, सतीश साळवे, संजय साळवे,प्रकाश विधाते, ऋषी विधाते, सुरेश वैरागर, संतोष शिरसाठ, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आशा निंबाळकर, अरुणा गोयल, तसेच महायुतीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.