प्रशासकिय

खर्च निरीक्षकांनी घेतला अकोले मतदारसंघातील खर्च विषयक कामकाजाचा आढावा

अहिल्यानगर दि. 24 ऑक्टोबर (प्रतिनिधी ):- भारत निवडणूक आयोगामार्फत अकोले विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक देबशीष बिस्वास (आय.आर.एस) यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च विषयक कामकाजाचा आढावा घेतला.
निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे व खर्च पथकातील इतर अधिकारी उपस्थित होते.
श्री.बिस्वास यांनी सर्व समन्वयक अधिकारी व खर्च व्यवस्थापनासंदर्भात उपस्थित इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच आणि योग्यप्रकारे करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय संवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली.
निवडणूकीत उमेदवारी दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चावर नोडल अधिकारी तसेच सहाय्यक खर्च निरीक्षकांनी लक्ष ठेवून दैनंदिन अहवाल विहीत वेळेत सादर करावेत. निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचे मूल्यमापन करण्यासाठी दर निश्चित करण्यात आले असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च निश्चित करावा,अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

*खर्च निरीक्षकांचा मुक्काम संगमनेर येथे*
देबशीष बिस्वास (आय.आर.एस) यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे असणार आहे. त्यांच्याशी ८९०२१९९९०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून अपर प्रवरा सब डिव्हीजनचे सहायक अभियंता प्रमोद माने यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८६५७५७७७७७, ८९७५२२४८१९ असा आहे, असे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे. खर्च निरीक्षक यांच्याशी निवडणूकविषयक प्रश्नाबाबत भेटीची वेळ ही सकाळी ११.०० ते १२.०० दरम्यानची निश्चित केली असून खर्च निरीक्षक यावेळेत अकोले तहसील कार्यालय (नवीन इमारत) येथे उपस्थित असतीलअसे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. यादव यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे