दोन गावठी पिस्तुल व चार जिवंत काडतुस विक्रीकरीता जवळ बाळगणारा आरोपी जेरबंद! कोतवाली पोलीसांची धमाकेदार कारवाई

अहिल्यानगर दि. 23 ऑक्टोबर(प्रतिनिधी )दि.२२/१०/२०२४ रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री.प्रताप दराडे सो यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम हा अग्निशस्त्र (गावठी कटटा) खरेदी करुन विक्री करण्याकरीता घेवुन जाणार आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला सदर ठिकाणी जावुन स्वत:ची सुरक्षितता बाळगुन खात्री करुन काही आक्षेपार्ह मिळुन आल्यास त्याचेवर कारवाई करा असा आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे स्टेशन ते शक्कर चौक जाणारे रोडवरील लोखंडी पुलावर सापळा लावला असता तेथे एक इसम संशयीतरीत्या पाठीवर काळया रंगाची बॅग लावुन चालत जात असताना मिळुन आला असता त्यास पंचासमक्ष जागीच पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत त्याचे पाठीला असलेल्या काळया रंगाच्या बॅगेत गावठी बनावटीचे दोन लोखंडी अग्निशस्त्र व ४ जिवंत काडतुसे असा एकुण ८०,८००/- रु किंमतीचा मुददेमाल आरोपी नामे विशाल नामदेव चंद्रे वय २१ वर्षे रा. शनि शिंगणापुर मंदिरामागे, शिंगणापुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर याच्या कबज्यात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे सदर गावठी कट्यांबाबत विचारपुस केली असता त्याने अहिल्यानगर शहरातील बंटी ऊर्फ भावेश अशोक राऊत यांचेकडून खरेदी केले असून ते विक्री करीता घेवुन जात असले बाबत सांगितले असुन त्यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणेत आणुन त्याचे विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोकाँ /२५४५ सतीष मारुती शिंदे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि नं /२०२४ शस्त्र अधिनियम १९४९ चे कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास हा मसपोनि योगिता कोकाटे या करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सोो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सोो, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ प्रताप दराडे, व गुन्हे शोध पथकाचे मसपोनि / योगिता कोकाटे,पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, सुर्यकांत डाके, पोकों/ अभय कदम, अमोल गाढे, अतुल काजळे,सतिष शिंदे, राम हंडाळ, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.