राजकिय

दिल्ली मध्ये आहे आप नगरमध्ये आहे, आमदार संग्राम जगताप”! “वक्त आयेगा तो मै दे दूंगा मेरी जान लेकिन किसीको बदलने नहीं दूंगा मेरे बाबासाहेब का संविधान”! “कवाडे सर और मुझमे हैं दलित मुक्ती का जिगर इसीलिये मै हूं जयभिम कि फिगर” :ना : रामदास आठवले

अहमदनगर दि. 3 सप्टेंबर (प्रतिनिधी ) “दिल्लीमध्ये आहे आप नगरमध्ये आहे, आमदार संग्राम जगताप”!
“वक्त आयेगा तो मै दे दूंगा मेरी जान लेकिन किसीको बदलने नहीं दूंगा मेरे बाबासाहेब का संविधान”! “नरेंद्र मोदी बढा रहे हैं देश कि शान नहीं बदल सकता भारत का संविधान” अशा खुमासदार भाषणाने केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदास आठवले यांनी नगर येथील सहकार सभागृह येथे आयोजित संविधान सन्मान मेळाव्यास संबोधित केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हूणन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर हे होते. यावेळी पीआरपी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, आरपीआय चे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जेष्ठ नेते अशोक गायकवाड, विजय वाघचौरे, सुवेंद्र थोरात, राजाभाऊ कापसे,सुनील साळवे, प्रा. माणिक विधाते,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना ना. आठवले म्हणाले प्रा. कवाडे सर व मी आम्ही दोन नेते संविधानाला मजबूत करणारे नेते आहोत. मी 1990 ला मंत्री झालो त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मी कवाडे सरांना म्हणालो होतो माझ्यासोबत चला पण सर त्यावेळेस आले नाही. मग मी शरद पवार यांना पाठिंबा दिला व मंत्री झालो. आता माझा एकही खासदार नसतांना मला तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री पदाची संधी नरेंद्र मोदी साहेबांनी दिली आहे. कारण आमच्या पक्षामुळे नरेंद्र मोदी देखील तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. यावेळी प्रा. कवाडे यांच्याकडे पाहत मंत्री आठवले म्हणाले सर तुम्हाला काय मागायचे ते मागा, पण माझे मंत्रीपद काही मागू नका असे म्हंटल्यावर उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यामध्ये खळ खळून हशा पिकला यावेळी त्यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामाचे कौतुक केले. यावेळी नामदार रामदास आठवले यांचा तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला. संविधान सन्मान मेळाव्याचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामाबदल त्यांचा ना. आठवले व प्रा. कवाडे सर यांच्या उपस्थितीत मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांनी केले, यावेळी निमंत्रक अजय साळवे व सुमेध गायकवाड यांनी कार्यक्रम आयोजन करण्यामागची भूमिका विशद केली.
संविधान सन्मान मेळाव्यास जेष्ठ नेते विजय भांबळ, प्रा. विलास साठे सर, प्रा. जाधव सर, संभाजी भिंगारदिवे, विजय जगताप,प्रकाश साळवे,प्रा. जयंत गायकवाड, पत्रकार महेश भोसले, किरण दाभाडे, सुरेश भिंगारदिवे, गणेश साळवे, अमित काळे,नितीन साळवे, नितीन कसबेकर, सारंग पटेकर, विशाल गायकवाड, विनोद साळवे, जितेंद्र कांबळे, विनायक संभागळे, जयाताई गायकवाड, गौतमी भिंगारदिवे, हिराबाई भिंगारदिवे, सदाशिव भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, अविनाश भोसले, विवेक भिंगारदिवे, दया गजभिये,निखिल साळवे, अनुराधाताई साळवे, सुनीता पाचारणे,सुमन काळापहाड, शबाना शेख, नयन खंदाऱे, पूनम जोशी, मनीषा खंडागळे, वदंना पातारे, नंदा जगताप, राधा पाटोळे, चंद्रभागा कांबळे, अनिता आंग्रे, रखमाबाई कांबळे, करुणा खातून,राहुल साळवे, मेहेर मिसाळ, प्रतीक साळवे, ऋतिक साळवे, विशाल पंचमुख, प्रबुद्ध कांबळे, तेजस पाचारणे, किरण पवार, मयूर पाचारणे, सत्यम चाबुकस्वार, सिद्धांत पंडागळे, गौरव पंडागळे, रुपेश भोसले, यश साळवे, मिलिंद साळवे, सुजित साळवे, त्याचप्रमाणे फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे