सामाजिक

सर्व्हेर डाऊन रेशन दुकानदार व ग्राहकांना मनस्ताप!

जामखेड दि. 29 जुलै (प्रतिनिधी रोहित राजगुरू) :- शासनाच्या वतीने शिधा पत्रिका धारकांना मोफत धान्याचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु धान्याचे वाटप करत असताना वापरण्यात येत असलेल्या पॉश मशीनला नेहमीच सर्व्हेरचा
अडथळा येत असल्याने दुकानदार व
शिधापत्रिका धारकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून लवकरात लवकर मार्ग काढत सर्व्हेरच्या अडचणी शासनाने सोडवाव्या अशा मागणीचे निवेदन जामखेड मधील रेशन धान्य दुकानदारांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
यावेळी प्रकाश काळे, संतोष उत्तमराव पवार, नरेंद्र महादेव जाधव, दिलिप बलभीन बहिर, विनोद शिवाजी रंधवे, अनिल मधुकर श्रीरामे आदी रेशन दूकानदार उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, जुलै महिन्यामध्ये आपल्या सर्व स्वस्त धान्य दुकानदार ई- के- वायसी करण्यासाठी तसेच धान्य वितरण करण्यासाठी पुर्ण वेळ देऊन प्रयत्न करत आहेत. धान्य देतांना मशीन अचानक बंद पडत आहेत. ई पॉश मशीनला सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे सर्व स्वस्त धान्य दुकानदार त्रस्त झाले आहेत. रोजच्या रोज धान्य लाभार्थी दुकानात येऊन स्वस्त धान्य दुकानदारांना नको त्या भाषेत बोलत आहेत. रोजच्या होणाऱ्या मानसिक त्रासाला दूकानदार कंटाळलेले आहेत. त्यामुळे आमची आपणास विनंती आहे की सर्व तांत्रिक अडचणी दूर होण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा तसेच जुलै महिन्याचे धान्य वितरण करण्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्णपणे मुदतवाढ देण्यात यावी. त्यामुळे लवकरात लवकर या सर्व्हेरच्या
अडचणी दूर कराव्या नाही,तर ऑफलाइन धान्य वाटप करण्यास परवानगी देत त्यास मुदतवाढ द्यावी. कोणताही लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे