अहमदनगर दि. (प्रतिनिधी ) नगर शहराचे ग्रामदैवत म्हणजे माळीवाडा भागातील विशाल गणपती ज्या ठिकाणी भाविक मोठया श्रध्येने नतमस्तक होतात. पण याच ठिकाणी अनेक बेकादेशीर धंदे उदा.लॉजवर चालणारा वेश्या व्यवसाय त्याचप्रमाणे सरास चालणारा मावा विक्री व्यवसाय! हे व्यवसाय पोलीस प्रशासनाकडून का दुर्लक्षित केले जातात? हा प्रश्न माळीवाडा भागातील नागरिक व नगरकरांच्या मनात निर्माण होत आहे. हे स्वभाविकच आहे.
काही दिवसापूर्वी खासदार लंके यांनी नगर शहरातील व जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्याच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपोषण सुरु केले होते, त्यावर जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्ण बंद असे आदेश देखील पोलीस महासंचालक यांनी काढले. परंतु पोलिसांनी दोन दिवस काडीने औषध लावण्याची जुजबी कार्यवाई केली देखील, पण माळीवाडा भागात विशाल गणपती या ग्रामदैवत असणाऱ्या ठिकाणी क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांच्या बाजूलाच पारिजात नावाचे लॉज आहे. त्याला लागतच एक टपरी व त्याच समोर दुसरी टपरी या ठिकाणी मावा सरासपणे खुलेआम विकला जात आहे. तो कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. “त्या ” मावा विक्री करणाऱ्याची विक्री आहे जोरात, पण पोलीस का जात नाहीत त्यांच्या दारात, यांना नेमके अभय कोणा नेत्याची कि पोलिसांचे अशा चर्चा माळीवाडा व नगर शहरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहेत. नगर शहरात अवैध धंदे सुरु आहेत म्हटल्यावर जिल्ह्यात देखील सुरु असणार यात आता शंका उरली नाही.
माळीवाडयातील “त्या ” मावा विक्री करणाऱ्यावर कार्यवाई होणार का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा