मानव सेवा प्रकल्पाचे सेवाभावी कार्य प्रेरणादायी – मनोज भालसिंग.
अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळाच्या वतीने प्रकल्पातील निराधार मनोरुग्णांना अन्नधान्य किराणा वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील निराधार मनोरुग्णांना अन्य धान्य किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज भालसिंग यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज भालसिंग, संतोष भालसिंग सर, गणेश बोठे, अक्षय बोठे आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज भालसिंग म्हणाले की मानव सेवा हीच ईश्वर सेवा ब्रीद वाक्य घेऊन कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून केले तर गरजू घटकांना विविध स्वरुपात मदत देऊन सहकार्य केले.व मानव सेवा प्रकल्पाचे उपेक्षित, निराधार, पीडित मनोरुग्ण सेवेचे सेवाभावी कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगून. माणुसकीच्या भावनेने सुरु असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले त्यामूळे अरणगाव रोड येथील मानवसेवा प्रकल्पातील निराधार मनोरुग्णांना अन्नधान्य किराणा वाटप करण्यात आले तसेच मानवसेवा प्रकल्पाला दिलेल्या मदतीबद्दल प्रकल्पाचे समन्वयक सुशांत गायकवाड यांनी मनोज भालसिंग व उपस्थित सर्वांचे आभार मानले.