छावणी परिषदेचे उपाध्यक्ष राठोड यांची उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा: प्रकाश लुनिया.
खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड ही व्यक्ती व त्याचे कुटुंबीय हे सर्व अहमदनगर छावणी परिषद हद्दीतील रहिवासी नसून ते राधानगरी नागरदेवळे येथील रहिवासी आहेत. त्यांनी छावणी परिषदेच्या कार्यालयात खोटी कागदपत्रे देऊन भिंगार सदर बाजार येथील रहिवासी आहे असे भासवून छावणी परिषदेचे उपाध्यक्ष पदी नामनिर्देशित सदस्य पद भूषवित आहे वसंत राठोड हे अहमदनगर छावणी परिषद हद्दीतील रहिवासी नसून त्यांचा आणखी एक पुरावा सादर केलेला आहे त्यांचा स्वयंघोषणापत्र त्या पत्राची झेरॉक्स जोडलेली आहे त्यामुळे छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. त्याचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करून त्यांना त्यांच्या पदावरून काढण्यात यावे. या मागणीसाठी प्रकाश लूनिया यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर छावणी परिषद यांना पुराव्यासहित निवेदन देऊन मागणी केली आहे. लुनिया यांनी या पत्राची प्रत डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट तसेच प्रिन्सिपल डायरेक्टर पुणे व जिल्हाधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.