विहीरीच्या कामावरील 3 मजुरांच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या!

अहमदनगर दि. 19 जून (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा येथील शेतकरी वामन गेणा रणसिंग यांचे विहीरीवर इसम संजय शामराव इथापे रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा याने विहीरीमधील ब्लास्टींगचे कामासाठी मजुर ठेवुन त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण, साधने व सुरक्षा न देता मजुर जिलेटीनच्या कांड्या विहीरीचे होलमध्ये भरतांना स्फोट होवुन मजुर नामे 1) सुरज ऊर्फ नसीर युसूफ इनामदार, 2) गणेश नामदेव वांळुज दोन्ही रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा व 3) नागनाथ भागचंद्र गावडे रा. बारडगांव, ता. कर्जत यांचे मृत्युस व 3 मजुरांचे गंभीर दुखापतीस कारणीभुत झालेवरुन संजय शामराव इथापे यांचे विरुध्द श्रीगोंदा पो.स्टे.गु.र.नं. 589/2024 भादविक 304, 285, 286, 337, 338 सह बारी अधिनियम कलम 3, 4, 5 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गंभीर स्वरुपाची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना वर नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 17/06/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले, रोहित मिसाळ, देवेंद्र शेलार, भाऊसाहेब काळे, रविंद्र घुंगासे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुन गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. स्थागुशा पथकाने फरार आरोपी नामे संजय इथापे याचा त्याचे राहते घरी तसेच त्याचे मित्र व नातेवाईकांकडे शोध घेता आरोपी मिळुन येत नव्हाता. दरम्यान पथक फरार आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत आरोपी नामे संजय इथापे हा हडपसर, जिल्हा पुणे येथे असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने हडपसर, जिल्हा पुणे येथे जावुन आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन, तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) संजय शामराव इथापे, रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेवुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उविपोअ, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.