नागापुर येथे विनापरवाना अवैध्यरित्या धारधार लोखंडी कोयता घेवुन दहशत करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी केले गजाआड!
अहमदनगर दि. 19 जून (प्रतिनिधी )
दिनांक १८/०६/२०२४ रोजी 5 वा. चे सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम अशिष उर्फ अंतवन पाटोळे वय-२० वर्ष रा. नागापुर ता.जि. अहमदनगर याचे कडे एक अवैध्यरित्या लोखंडी धारधार कोयता असुन तो परीसरात दहशत करुन फिरत आहे. यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन सदर इसमास चक्रधर स्वामी मंदीर परीसर नागापुर ता. जि. अहमदनगर येथे ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशिष उर्फ अंतवन पाटोळे वय-२० वर्ष रा. नागापुर ता. जि. अहमदनगर असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ एक धारधार लोखंडी कोयता मिळुन आला. सदर कोयता त्याचेकडुन जप्त करुन सदर इसमाविरुदध एमआयडीसी पोस्टे गु रजि. ५११ /२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करत आहोत.
आरोपी नामे अशिष उर्फ अंतवन पाटोळे वय-२० वर्ष रा. नागापुर ता. जि. अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन
तोफखाना पोस्टे अ.नगर
एमआयडीसी पोस्टे अ.नग
एमआयडीसी पोस्टे. अ.नगर
गुन्हा रजि.नं.व कलम
950/2022 भादवि कलम 326,324,323,143,147,148 प्रमाणे.762/2023 भादवि कलम 324,323,143,147,148,427 प्रमाणे. 511/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे.
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, श्री. संपतराव भोसले सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि माणिक बी. चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोहेकॉ नंदकिशोर सांगळे, पोहेकॉ राजु सुद्रिक, पोना विष्णु भागवत, पोकों/किशोर जाधव, पोकॉ/ नवनाथ दहिफळे, मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.