अहमदनगर दि. 19 जून (प्रतिनिधी ) नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघातीलच नव्हे तर राज्यातील शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना हा एक महत्वाचा प्रश्न तडीस लावणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी नगर कल्याण रस्त्यावर आयोजित वृंदावन लॉन्स येथील शिक्षक संवाद मेळाव्यात केले.
यावेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी टीडीएफ या शिक्षक संघटनेचे जेष्ठ नेते राजेंद्र लांडे सर, अशोक झरेकर सर, घोडके सर, संजय गायकवाड सर, संजय धोपावकर सर, डॉ. शरद मगर सर, भुतारे सर, अजय भिंगारदिवे सर, संजीवन साळवे सर, थोरात मॅडम तसेच नगर शहर,कर्जत, जामखेड त्याचप्रमाणे तालुक्यातून आलेले शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले शिक्षक पदवीधर मतदार संघच का? असा प्रश्न तुमच्या मनात पडणे स्वभाविक आहे. त्याचे कारण आपल्यातीलच काही सहकारी शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल चर्चा करत असत, ज्या देशातील भविष्य घडविण्याचे काम शिक्षक करतात त्यांचे प्रश्न अनेक आहेत. म्हणून मी ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.जिल्ह्यातील टीडीएफ या शिक्षक संघटनेने पाठिंबा दिला. ” अकेला चलता गया कारवा बनता गया ” अशी घटनाक्रम होत गेला. शिक्षक मतदार संघातील पाचही जिल्ह्यात चांगले पाठबळ लाभत आहे. चांगली पिढी फक्त शिक्षक बांधवच निर्माण करू शकतो यावर माझा विश्वास असून, शिक्षकांसाठी प्रत्येक तालुक्यात महात्मा फुले सदन उभे करण्याचा माझा मानस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी 26 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत अनु. क्रमांक 9 व पसंती क्रमांक 1 समोरील बटन दाबून मला आपले आशीर्वाद दयावेत असे आवाहन त्यांनी उपस्थित शिक्षक बांधवाना केले. कार्यक्रमाचे आभार जेष्ठ नेते राजेंद्र लांडे सर यांनी केले. कार्यक्रमा नंतर स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या हक्काचा मित्र शिक्षक उमेदवार विवेक कोल्हे यांच्या सोबत मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा