अहमदनगर दि. 19 जून (प्रतिनिधी) -जनतेने मला जनसेवक म्हणून संधी दिली आहे लोकसभेच्या महाराष्ट्राच्या या दोन जागेच्या निकालावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. एक बारामतीची आणि दुसरी पवार साहेबांनी दिलेल्या अहमदनगर लोकसभेच्या या पठ्याची या दोन्ही जागांवर उमेदवारांना पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले परंतु जी निवडणूक जनतेने हातात घेतली तेथे जनतेचाच विजय होतो. असा रचलेला विजयाची इतिहास देखील नोंद ठेवत असतो. आज जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारास खासदार पदासाठी निवडून दिलेला आहे. जनतेचा हा जनसेवक आपल्या पदाचा वापर ज्यांनी निवडणुकीत दगा दिला किंवा विरोधी पक्षात गेले विरोधी उमेदवारांबरोबर सांगड घातली किंवा निवडणुकीदरम्यान विरोधी उमेदवाराबरोबर शाब्दिक हेवेदेवे झाले असतील हे सर्व मी निकालानंतर विसरून गेलो आहे आता खासदारकीचा वापर फक्त जनसेवक या नात्याने जनतेच्या कामासाठीच केला जाईल असे प्रतिपादन नवनिर्वाचित व नेहमी चर्चेत आलेले मोबाईल खासदार निलेश लंके यांनी केडगाव मधील सर्वपक्षीय व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित विजयत्सोव सत्कार कार्यक्रम प्रसंगी केले.
सुरुवातीस केडगावच्या रेणुका मातेचे मंदिरात आरती घेण्यात आली व दर्शनानंतर विजयत्सोह मिरवणूक केडगाव देवी मंदिर ते केडगाव वेसी पर्यंत काढण्यात आली त्यानंतर वेसी मध्ये विजयी सभा घेण्यात आली या सभेसाठी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते मा .महापौर भगवान फुलसौंदर मा . महापौर अभिषेक मा. विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोऱ्हाटे कळमकर मा .नगरसेवक अमोल येवले मा .नगरसेवक विजय पठारे मा . नगरसेवक योगिराज गाडे ओंकार ट्रेडर्स चे संजय गारुडकर हर्षवर्धन कोतकर वसंतमामा शिंदे संजय मुनोत सोपानराव कारखिले ओंकार सातपुते संग्राम कोतकर गौरव कार्ले बबलू कोतकर कार्तिक सातपुते ओंकार गारुडकर विठ्ठल महाराज कोतकर अजय आजबे शिवसैनिक सोपानराव कारखिले रावसाहेब भाकरे महाराज केडगाव ग्रामस्थ केडगाव जागरूक मंचाचे विशाल पाचारणे शिवाजी डमाळे पप्पू भाले पै .अगंद महानवर हाजी उस्मान मनियार हुसेन भाई मंडपवाले केडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
मा .नगरसेवक अमोल येवले यांनी निवडणुकीपूर्वीचे किस्से सांगत केडगाव मध्ये जी विकास कामे अडवूण ठेवण्यात आली आहेत ती मी जातीने लक्ष देऊन नवनिर्वाचित खासदार निलेश लंके च्या सहकार्याने तडीस नेणार व केडगाव मध्ये विकासाची गंगा वाहणार असल्याचा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला केडगाव साठी आता आपणास स्व .आमदार अनिल भैय्या राठोड नंतर पुन्हा एकदा हक्काचा माणूस जनतेने दिलेला मोबाईल खासदार आपल्याला मिळालेला आहे असे त्यांनी सांगितले
यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते मा महापौर अभिषेक कळमकर मा .नगरसेवकविजय पठारे मा नगरसेवक योगिराज गाडे पेन्शनर्स असोसिएशनचे मनोज संग्राम कोतकर हर्षवर्धन कोतकर अजय आजबे कार्तिक सातपुते संजय मुनोत यांची देखील भाषणे झाली
कार्यक्रमाचे आयोजन केडगाव शिवसेना व मा. नगरसेवक अमोल येवले मित्र परिवार च्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल महाराज कोतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रावसाहेब भाकरे महाराजांनी केले.
चौकट -कार्यक्रमाच्या वेळी अचानकपणे वीज पुरवठा खंडित करण्यात आला यावेळी उपस्थित व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांना सांगितले की आम्हाला हे अपेक्षितच होते. ज्या ज्या वेळेस आम्ही कार्यक्रम घेतो. त्यावेळेस लाईट घालवली जाते. तुमच्या प्रचारादरम्यान देखील असेच करण्यात आले होते. यावर खासदार निलेश लंके यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावत याचा जाब विचारला मी ज्या ज्या वेळेस या ठिकाणी प्रभागत प्रचाराला गेलो त्या – त्या वेळेस आपण लाईट खंडित केली आजही माझ्या जनतेने आयोजित केलेल्या विजयत्सोहात आपण कार्यक्रमांमध्ये कोणाच्या तरी दडपणाखाली येऊन विर्जन कालवत आपण पुन्हा वीज पुरवठा खंडित केला आहे. पाच मिनिटात लाईट आली नाही. तर हा विजय उत्सव मी आपल्या कार्यालयात येऊन साजरा करेन असे म्हणत फोन कट केला फोन कट करतात ताबडतोब खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. व परिसर प्रकाशीत होताच जनसेवकाच्या या विजय उत्साला पारावारच उरला नाही. एवढ्या टाळ्यांच्या गजरात नवनिर्वाचित खासदारांचे स्वागत केडगावकरांनी केले खंडित वीज पुरवठ्याच्यादरम्यान सर्वांनी आपल्या मोबाईलच्या फ्लॅश लाईट ऑन केल्या.