गुन्हेगारी

धक्कादायक : रत्नदीप संस्थेत संस्थाचालकाने हरीण राखले , वनविभागाकडून डॉ .भास्कर मोरे आणखी एक विरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड दि. 11 मार्च (प्रतिनिधी रोहित राजगुरू)
रत्नदीप मेडिकल फौंडेशनचा संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या संस्थेत हरीण पाळले होते. त्यामुळे त्याच्या विरोधात वनविभागाच्या वतीने भारतीय वन्यजीव १९७२ अन्वये गुन्हा दाखल करुन जखमी हरणास शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की काल दि ९ मार्च रोजी विद्यापीठाची कमीटी तपासासाठी आली असता याच दरम्यान काॅलेजमध्ये दोन हरीण व्हीडिओ मध्ये आढळून आले. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला तोच धागा पकडून यातील काही आंदोलन कर्त्यांनी कॉलेजच्या एका खोली मध्ये हरीण असल्याचा संशय व्यक्त केला होता. परंतु कमीटीचा तपास चालु आसल्याने या गोष्टीकडे कोणीही लक्ष दिले नाही.
त्यानंतर आज दि १० मार्च रोजी वनविभागाचे वनसेवक तहेरभाई सय्यद यांना एका व्यक्तीचा फोन आला की एक हरीण रत्नदीप मेडिकलच्या आवारात जखमी असलेले हरीण आढळून आले आहे. त्यानंतर जखमी अवस्थेतील हरणास जामखेड येथिल पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी हरण दोन्ही पायांनी जखमी झाले होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खेत्रे यांनी सदर हरणावर उपचार केले.
जामखेड येथील वनसंरक्षक तेलंगे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर शेळके व त्यांच्या पथकाने आंदोलन कर्त्यासमवेत रत्नदीप कॉलेज मधिल सदर खोलीची तपासणी केली असता त्याठिकाणी हरणाची विष्ठा अढळुन आली त्या वरुन ताब्यात घेतलेले हरीण याच खोलीत ठेवले असल्याचे निदर्शनास आले.
या सर्व बाबीवरुन व आंदोलन कर्त्यांनी दिलेल्या व्हीडिओ मधिल हरीण व सापडलेले हरीण एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. या नुसार रत्नदीप मेडिकल फौंडेशन चे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांचेवर भारतीय वन्यजीव १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशी माहिती कर्जत जामखेड चे वनपरिक्षेत्राचे अधिकारी मोहन शेळके यांनी दिली आहे.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, वनरक्षक एन यु तेलंगे, प्रविण उबाळे, एस. ए सपकाळ, कर्मचारी ताहेभाई सय्यद, एस.पी डोंगरे, एस.व्ही चिलगर, एस.एन नेहरकर, आर.एस सुरवसे, एस.के सुर्यवंशी व एच .के. माळशिकारे या पथकाने सदर कारवाई केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे