सामाजिक

सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात गरजु रुग्णांनी लाभ घेण्याचे शिवजयंती उत्सव समिती कडुन आवाहन

जामखेड दि. 13 फेब्रुवारी (प्रतिनिधी रोहित राजगुरू)

जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव व जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.१२ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत जामखेड येथील शिलादीप हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आसुन याचे उद्घाटन नुकतेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रा मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, अवधूत पवार, निखिल घायतडक,उमरभाई कुरेशी, नय्युम बिल्डर, विनायक राऊत,विकास पवळ, प्रशांत राळेभात, वसीम सय्यद, डॉ.कैलास हजारे,आमोल गिरमे, महेश यादव,जामखेड तालुका डाॅक्टर असोशिएशन चे अध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड, सचिव डॉ सादेख पठाण, कोषाध्यक्ष डॉ चंद्रकिरण भोसले, डॉ भरत देवकर, डॉ अविनाश पवार, डॉ मेघराज चकोर, डॉ आसिफ मोमीन, डॉ विकी दळवी, डॉ विक्रांत केकाण, डॉ आबेद जमादार, डॉ सुशिल पन्हाळकर, डॉ. मेघराज चकोर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की शिवजयंती उत्सवा नित्यनेमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार होणार आहेत. तालुक्यातील गरजु रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. उमरभाई कुरेशी यांनी बोलताना सांगितले की या शिवजयंती उत्सवात सर्वांना समावुन घेतले ही कौतुकास्पद बाब आहे. सर्व धर्म समभावाच्या या शिवजयंतीचे महाराष्ट्र नाव होईल. शिबीरामुळे गोरगरीब रुग्णांचे पैसै वाचणार आहेत. यानंतर विनोद राऊत यांनी बोलताना सांगितले की हा उत्सव सर्वधर्मीय साजरा होत आहे या मध्ये सर्वांना समावुन घेतले त्या बद्दल कौतुक वाटते. शिलादिप हॉस्पिटल चे संचालक डॉ प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की या शिवजयंती उत्सवात तळागाळातील लोकांनी सहभागी व्हावे तसेच या शिबिरात पुढे कोणाला आजार होऊ नये कींवा झाला असेल तर तो वाढु नये यासाठी सर्वांनी मोफत तपासण्या करून घ्याव्यात.
सोमवार दि १२ फेब्रुवारी रोजी मेडिसीन तपासणी प्रसिद्ध र्‍हदयरोग तज्ञ डॉ. विक्रांत केकाण व डॉ प्रशांत गायकवाड हे रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. मंगळवार दि १३ फेब्रुवारी रोजी ऑर्थोपेडीक डॉ. सुशिल पन्हाळकर हे रुग्णांच्या हाडांची तपासणी करणार आहेत. बुधवार दि १४ फेब्रुवारी रोजी नेत्ररोग तज्ञ डॉ. विद्या तोंडे, सर्जन सचिन टेकाडे व डॉ. सर्फराज खान हे तपासणी करणार आहेत. गुरुवार दि १५ फेब्रुवारी रोजी स्त्री रोग तज्ञ डॉ. चारुदत्त पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ राजु राठोड, बालरोग तज्ञ डॉ. आसिफ मोमीन व विकी दळवी हे रुग्णांच्या मोफत तपासणी करणार आहेत. शुक्रवार दि १६ फेब्रुवारी रोजी दंतरोग तज्ञ डॉ. प्रतिभा मुंडे, डॉ. कामरान आतार, आयुर्वेद तज्ञ आबेद जमादार, डॉ. चंद्रकिरण भोसले, होमिओपॅथिक तज्ञ डॉ. शहनाज पठाण हे तपासणी करणार आहेत तर शनिवार दि १७ फेब्रुवारी रोजी त्वचारोग तज्ञ डॉ. जी. एस. गायकवाड, नाक कान घसा तज्ञ डॉ. महावीर कटारीया डॉ. अमित पळवदे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.
या शिबिराची खास वैशिष्ट्य म्हणजे शिबिरातील तपासणीमध्ये ज्यांना ऑपरेशन गरजेचे आसेल त्यांच्यासाठी ऑपरेशन फ्री मध्ये ५०% सवलत देण्यात येणार आहे. तसेच एक्स-रे मध्ये देखील ५०% सवलत देण्यात येणार असुन ईसीजी, ब्लड ग्रुप व शुगर या रुग्णांच्या मोफत तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे सात दिवस चालणाऱ्या या महाआरोग्य शिबिरात तालुक्यातील जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी आपल्या तपासण्या करून घ्याव्यात आसे अवहान आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे