शहरातील झेंडीगेट परिसरात तीन मालवाहु गाड्या,दोन लोखंडी सत्तुर,12 गौवंशीय जनावरे व 3 म्हैसवर्गीय जनावरे, अंदाजे 600 किलो गोवंशीय जनावराचे मांस असा एकुण 20.55,000/- रु किं.चा (वीस लाख 55 हजार ) मुद्देमाल जप्त करुन 1 आरोपी ताब्यात कोतवाली गुन्हे शोध पथकाची सर्वात मोठी कारवाई

अहमदनगर दि. 13 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
सविस्तर हाकिकत अशी कि,दि. 13/02/2024 रोजी मध्यरात्री 01.30 वा. चे सुमारास पोलीस निरीक्षक शप्रताप दराडे यांना अहमदनगर शहरात झेंडी गेट परिसरातील कारी मस्जिद जवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालय जवळ एका बंद खोलीत गोवंशीय जनावरांची कत्तल चालु असुन कत्तलीकरीता काही गौवंशीय जनावरे आणल्याची खात्रीलायक माहीती मिळाली. पो. नि. प्रताप दराडे यांनी तात्काळ रात्रगस्त पेट्रोलिंगचे अधिकारी, अंमलदार यांना नमुद ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले. रात्रगस्त पोलीस अधिकारी यांना मदतकामी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन 02.15 वा. छापा टाकुन कारवाई केली. पोलीसांनी पंचासमक्ष तीन मालवाहु गाड्या, दोन लोखंडी सत्तुर, 12 गौवंशीय जनावरे व 3 म्हैसवर्गीय जनावरे, अंदाजे 600 किलो गोवंशीय जनावराचे मांस असा एकुन 20.55,000/- रु किं.चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला. आरोपी 1) अरबाज खलील शेख, वय 23 वर्षे, रा. कोठला, अहमदनगर, 2) फैजल अस्लम शेख, वय 20 वर्षे, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर, 3) सलीम शब्बीर कुरेशी, 4) फैजान अब्दुल कुरेशी, रा. झेंडी गेट, अहमदनगर यांचेविरुध्द पो.कॉ. सुरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनला गु.र.नं. 164/2024 भा.दं.वि.कलम 269, महा. प्राणी रक्षा अधि सन 1995 चे सुधारीत सन 2015 चे कलम 5 (अ), 5 (क ), 9, 9(अ), तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणेबाबत अधि. 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास चालु आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोउपनिरी गजेंद्र इंगळे, गुन्हे शोध पथकाचे पोउपनिरीक्षक प्रविण पाटील, पो.कॉ. दिपक रोहोकले, पो.कॉ. सत्यजित शिंदे, पो.कॉ. तानाजी पवार, पो.कॉ. सुरज कदम, पो.कॉ. सोमनाथ केकान, पो.कॉ. शिवाजी मोरे, पो.कॉ. महेश पवार, पो.कॉ. अभय कदम, पो.कॉ. अमोल गाडे, पो.कॉ. संकेत धीवर यांनी केली आहे.