प्रशासकिय

लेखा व कोषागार दिन उत्साहात साजरा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उत्स्फुर्तपणे केले रक्तदान

अहमदनगर दि. 1 फेब्रुवारी (प्रतिनिधी ) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागारे दिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
संचालनालयातील विविध घटकांना एकत्र आणुन बंधुत्वाची भावना वाढीस लागण्याबरोबरच कोषागार कार्यालयाच्या प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे नियंत्रक सदाशिव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन धस, विशाल पवार, स्थानिक निधी लेखा परिषदेचे सहायक संचालक बाबासाहेब घोरपडे जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव भोसले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी मनोगतात कोषागाराचे प्रशासनातील महत्व सांगत लेखाविषयक काम पहाणाऱ्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी लेखाविषयक काम करताना आपल्या कामात अचूकता ठेवावी, यासाठी सर्व वित्तीय नियमांचा अभ्यास केला पाहिजे, असे सांगितले. कोषागारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही अभिनंदन केले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
यावेळी जिल्हा कोषागार कार्यालय व जिल्हा कोषागार कर्मचारी संघटना यांच्यावतीने भव्य अशा रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबीरामध्ये सहभाग नोंदवत उत्स्फुर्तपणे रक्तदानही केले.
कार्यक्रमास लेखा व कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे