कौतुकास्पद

6,30,000/- रुपये किंमतीच्या, 7 चोरीच्या महागड्या मोटार सायकलसह 3 आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेडया

अहमदनगर दि. 1 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, अहमदनगर जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना मोटार सायकल चोरी करणारे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/मनोहर गोसावी, संदीप पवार, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, पोना/भिमराज खर्से, फुरकान शेख, पोकॉ/सागर ससाणे, रणजित जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेवुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
पथक नगर शहर परिसरात फिरुन मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती घेत असताना दिनांक 30/01/2024 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे राहुल निकल रा. विळदघाट, ता. नगर हा साथीदारासह देहरे येथून विळदघाट बायपास येथे चोरी केलेली विना नंबर लाल रंगाची पॅशन प्लस मोटार सायकल विक्री करणे करीता येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले. पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन सापळा लावुन थांबलेले असताना दोन संशयीत इसम विना नंबर लाल रंगाचे मोटार सायकलवर येताना दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) राहुल विजय निकम वय 24, रा. विळदघाट, ता. नगर मुळ रा. वडगांवगुप्ता, ता. नगर व 2) बंडु सुदाम बर्डे वय 29, रा. देहरे, ता. नगर असे असल्याचे सांगितले. त्यास ताब्यातील मोटार सायकल व त्याचे कागदपत्रा बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी दुधडेअरी चौक, एमआयडीसी येथून सदर मोटार सायकल चोरी केली असुन विक्री करणे करीता आणली असल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी साथीदार नामे 3) अरुण बाळासाहेब धिरोडे वय 25, रा. बेलापुर, ता. श्रीरामपूर याचे सोबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, एमआयडीसी, निंबळक येथुन 4 व पुणे जिल्ह्यातील शिरुर व आळेफाटा येथुन 3 अशा विविध ठिकाणाहुन एकुण 7 चोरी केलेल्या मोटार सायकल पैकी तिन मोटार सायकल या त्याचेकडे व तिन मोटार सायकल या साथीदार बंडु बर्डे व एक मोटार सायकल ही साथीदार अरुण धिरोडे याचेकडे असल्याचे सांगितले. पथकास दोन्ही आरोपींकडे विविध कंपनीच्या 6 मोटार सायकल मिळुन आल्या व आरोपी नामे अरुण धिरोडे याचा बेलापुर ता. श्रीरामपूर परिसरात शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास चोरीची एक मोटार सायकलसह ताब्यात घेतले.

//2//
आरोपींचे कब्जातुन हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकलचे वर्णन खालील प्रमाणे –
अ.क्र. मोटार सायकलचा प्रकार चेसी नंबर इंजीन नंबर
1. हिरो होंडा पॅशन प्लस MBCHA10EL8GA12700 HA10EB8GA34123
2. बजाज पल्सर 150 MD2A11CY9KCF35190 DHYCKF54272
3. रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 ME3U3S5C1GC562031 U3S5C1GC152825
4. होंडा ऍ़क्टीव्हा ME4JF505DG7097938 JF50E73097263
5. बजाज पल्सर 220 MD2A13EZ9FCD43511 UADKZCFD3180
6. हिरो होंडा सीडी 100 — —
7. बजाज पल्सर 150 MD2A11CZ8GWC27054 DHZWGC42397

ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन 6,30,000/- रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या 7 मोटार सायकल मिळुन आल्याने आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. 57/2024 भादविक 379 प्रमाणे दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, व श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा.श्रीमती. स्वाती भोर मॅडल, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण व मा. श्री. सोमनाथवाघचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे